शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी व्यवसाय मंदीच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायाला मंदी आली आहे. त्यातच खलाशांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. माशांची मरतूक कमी होत असल्याने त्यांची आवक घटल्याने मासे महाग झाले आहेत.

विकासकामांकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : हजारो लोकवस्ती असलेला राजीवडा गाव हे नगरपरिषदेच्या हद्दीत आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गावात ना रस्ता सुस्थितीत, ना पाण्याचा पुरेसा पुरवठा, त्यामुळे लोकांचे हाल होत असून नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हॉटेल व्यवसायावर परिणाम

चिपळूण : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रशासनाने रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे रात्री १० नंतर सर्वत्र सामसूम होते, तसेच ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याने हॉटेल, धाबे वेळेवरच बंद करण्यात येत आहेत. रात्री १० नंतर ग्राहकही पाठ फिरवत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर होत आहे.

रस्ता रुंदीकरण कधी होणार ?

चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यात येणारी झाडे, छोट्या व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, वाडीतील अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या रस्ता रुंदीकरणात रस्त्यांची उंची व रस्त्यांची पातळी नीट ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे

गुहागरमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता

गुहागर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पशुसंवर्धन करत आहेत. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची कमतरता असताना, असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.

गटाराचे काम निकृष्ट असल्याचा आरोप

खेड : तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील सुलभ शौचालय व रस्त्यापर्यंत गटाराचे बांधकाम निकृष्ट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय मोडसिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.