शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना अजूनही ११ कोटींची प्रतीक्षाच

By admin | Updated: July 8, 2016 01:04 IST

अनुदान : नऊ कोटी उपलब्ध निधीचे वाटप सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यातील मासेमारी संस्थांच्या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या डिझेल अनुदानापोटी गेल्या वर्षांचा २० कोटींचा परतावा शासनाकडे थकीत होता. त्यापैकी अनुदानाची ९ कोटी इतकी रक्कम मत्स्य व्यवसाय खात्याकडे गेल्या आठवड्यात आली आहे. त्यातील ७ कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले, तर येत्या दोन दिवसात उर्वरित २ कोटी अनुदानाचे वाटप मच्छीमारांना होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हे अनुदान प्रत्येक महिन्याला दिले जावे, अशी मागणी होत आहे. याबाबत रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सांगितले की, जिल्ह्यात शासकीय डिझेल अनुदानाचा लाभ घेणाऱ्या ३३ सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था आहेत. त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या १७०० मासेमारी नौका असून, त्यांना डिझेलच्या दरावर अनुदान दिले जाते. प्रत्येक मासेमारी नौकेला ३५०० लीटर डिझेलचा शासकीय कोटा आहे. त्यातील उचल होणाऱ्या डिझेलवर हे अनुदान त्या सहकारी संस्थांमार्फत संस्था सभासद असलेल्या मच्छीमार नौकांना दिले जाते, अशी माहिती मिळाली आहे.गेल्या आर्थिक वर्षात मच्छीमारांना डिझेल अनुदानापोटी देणे बाकी असलेल्या अनुदानाची रक्कम २० कोटी होती. त्यातील ९ कोटी अनुदानाची रक्कम गेल्याच आठवड्यात रत्नागिरी विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.प्राप्त झालेल्या ९ कोटी अनुदानापैकी ७ कोटी अनुदानाचे आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. त्यातील उर्वरित २ कोटी रुपयांचे वाटप येत्या दोन दिवसात पूर्ण केले जाणार आहे. २०१५ - १६ या आर्थिक वर्षात मच्छीमारांना २६.९३ कोटी डिझेल अनुदान परतावा देण्यात आला आहे.थकीत असलेला ११ कोटींचा डिझेल परतावा व २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मिळणारे अनुदान असे ३९ कोटी रुपयांचे अनुदान यावर्षी मच्छीमारांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मच्छीमार सोसायट्यांकडे जमा होणारा डिझेल परतावा यापुढे जनधन योजनेच्या खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे. तो आरटीजीएस करून संस्थांनी मच्छीमारांना द्यायचा आहे. याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १७०० नौका : १ आॅगस्टला मासेमारी सुरू होणार...मासेमारी बंदीचा एक महिना संपला असून, अजून महिना बाकी आहे. १ जून २०१६पासून सागरी मामेसारी बंदी सुरू झाली आहे. ही बंदी ३१ जुलै २०१६ रोजी संपणार असून, १ आॅगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होणार आहे. १ जानेवारीपासून ३१ मेपर्यंत मच्छीमारीला बंदी घातलेल्या पर्ससीन नौकांनाही १ आॅगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत मासेमारी करता येईल, असे सांगण्यात आले.डिझेलवरील अनुदानाचा निर्णय घेताना शासनाकडून दर महिन्याला मच्छीमारांना परतावा दिला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. प्रत्यक्षात सहा ते आठ महिने होऊनही डिझेलचा परतावा दिला जात नसल्याने मच्छिमारांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे नाराजी असून, दर महिन्याला परतावा देण्याची मागणी करण्यात येत आहे.