शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात चिपळूण पोलिसांचे पहिले रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत मोबाईलच्या मिणमिणत्या उजेडाचा आधार घेत पाणी आणि अंधाराचा थरारक सामना करीत पहिले रेस्क्यू चिपळूण पोलिसांच्या टीमने केले. वळवळणारे साप, महापुराच्या पाण्याचा वाढता जोर, अंधाराची भयाणता, सोसाट्याचा वारा, कोसळणारा पाऊस, बोटीत भरणारे पाणी कधीही जिवावर बेतेल अशी स्थिती असताना, चिपळूण पोलिसांच्या पथकाने महापुरात पहिले रेस्क्यू ऑपरेशन केले.

चिपळूणचा महापूर आणि अडकलेले लोक बघितल्यानंतर आताही थरकाप भरत आहे. काही लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढणे अशक्य होते. पोलीस स्थानकात सतत वाचविण्यासाठी फोन येत होते. त्यातील एक म्हणजे शहरातील मार्कंडी भागातील मयूर निवास या ठिकाणी चार महिन्यांचे बाळ आणि त्याची आई महापुराच्या पाण्यात अडकली होती. पाणी क्षणा-क्षणाला वाढत होते, तर त्या दोघांना बाहेर काढायला काही तरी करा, अशी आर्त विनवणी केली जात होती. कोणताही पर्याय नसल्याने सारी यंत्रणा हतबल बनली होती. मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते. सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीहून सीमा शुल्कची टीम आली.

सीमा शुल्कच्या रेस्क्यू बोटीबरोबर सीमा शुल्कचे दोन कर्मचारी पुराच्या पाण्यात उतरले. बोट भोगाळे इथे येताच पाण्याच्या जोरदार माऱ्यामुळे बोट विरुद्ध दिशेला ओढली जाऊ लागली. बोटीत पाणी शिरले होते. चिंचनाका येथे बोट पोहाेचताच एटीएममध्ये एक व्यक्ती अडकल्याचे काहींनी सांगितले. रमा यांच्या कमरेभोवती रोप बांधून बोया पाण्यात फेकला गेला. सीमा शुल्क विभागाच्या एका साथीने पाण्यात झेप घेऊन एटीएमचे शटर वर केले. सुरक्षा रक्षक महेश लोटेकर हे एटीएम मशीनवर उभे हाेते. महेशने बचावकर्त्याच्या अंगावर उडी घेत बोयाचा ताबा घेतला. अथक्‌ प्रयत्नांनी बोयाच्या साहाय्याने महेशला सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. त्याचवेळी आपल्या ऑफिसमध्ये प्रमोद देवधर अडकले असल्याची आरोळी आली. काचेचा दरवाजा लोटून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर मार्कंडी येथे पुरात अडकलेल्या माय-लेकीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत सायंकाळचे साडेसात वाजले होते. पाऊस कोसळतच होता. बोटीत साचलेले पाणी रमा करमरकर काढत होत्या आणि अचानक हातातील टॉर्च पाण्यात पडला. समोर काहीच दिसेनासे झाले. त्यातच मोबाईलची लाईट सुरू करून परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा तोच सामना... बोटीला हेलकावे, भरकटणारी बोट असा संघर्ष करीत महापुरात उतरलेली पहिली रेस्क्यू टीम सहीसलामत परत आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक समद बेग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, रमा करमरकर, संदेश गुजर, गणेश शिंदे, हरेश पेढांबकर व होमगार्ड सुशांत आंब्रे आदी सहभागी होते.