शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा प्रशासनाचे संचारबंदीबाबतचे आदेश जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत ...

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत संचारबंदीच्या नियमावलीत कुठल्या बाबी सुरू राहणार आणि कुठल्या बाबींना मनाई करण्यात आली आहे, ते स्पष्ट करण्यात आले आहे.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक

ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास मनाई राहील; मात्र वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. यात रुग्णालये, रोग निदान केंद्रे, कलिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, अन्य खाद्य दुकाने यातून सवलत देण्यात आली आहे.

रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध देशांच्या परराष्ट्र संबंधविषयक कार्यालयांच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम, सेवा, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालाची - वस्तूंची वाहतूक, कृषीविषयक सेवा, तसेच ऑनलाइन व्यवहार, मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा त्याचबरोबर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्‍चित केलेल्या अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.