२. गणेशोत्सवामध्ये मुंबई-पुणे येथून गुहागर तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांची तपासणी व नोंदीविषयी प्रशासनाने नियोजन केले असले, तरी प्रत्यक्षात आलेले चाकरमानी आणि दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या नोंदीमध्ये मोठी तफावत आहे. असे असले, तरी तपासणी करण्यात आलेल्या ८०७ चाकरमान्यांमध्ये केवळ तिघेच काेरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, स्थानिकांमधील संक्रमणाचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे.
३. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याभरात एकूण ३,२०२ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले आहे, तर ५,१२१ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत. शासनाने कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केलील होती, शिवाय शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.