शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील पंधरा गाव विभागाचा संपर्क तुटलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील पंधरा गाव विभागातही महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील पंधरा गाव विभागातही महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने या भागाचा अजूनही या गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्याशिवाय कोणतीही शासकीय यंत्रणा या भागात पोहोचली नसल्याने ओरड केली जात आहे.

महापूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण पूर्व भागात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील अनेक कुटुंब उद्‌ध्वस्त झाले असून, काही घरांनाही फटका बसला आहे, तसेच मुख्य रस्त्यावरील चार पूल आणि पाच साकव वाहून गेले. नांदिवसे, ओवळी, कळकवणे, तिवरे, आकले, कादवड, इंदापूर, तिवडी, रिक्टोली, गाणे, दादर, स्वयंदेव, वालोटी, खडपोली गावांच्या दळणवळणाचा मार्गच बंद झाला आहे, तसेच विद्युत खांबही उन्मळून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला.

अतिवृष्टिमुळे नांदिवसे स्वयंदेव या ठिकाणी काशीनाथ शिवराम कातुरडे यांच्या घरावर दरड कोसळली असता, आजुबाजूच्या अकरा कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. बावलाई - नांदिवसे येथे घरामधून जमिनीला भेगा पडल्याने तेथील पाच कुटुंबांना तत्काळ ग्रामस्थांनी तात्पुरते स्थलांतरीत केले आहे. त्याचबरोबर नांदिवसे, दादर व कळकवणे गावच्या नळपाणी योजनेच्या विहिरी, पंप हाऊस आणि पाइपलाइन वाहून गेले आहे. दसपटी पूर्व विभाग आजही अंधारात आहे.

---------------------

तिवरे गावात पुन्हा अस्मानी संकट

तिवरे गावामध्ये दरड कोसळून घराच्या बाजूला आली आहे. त्याठिकाणी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण टीमला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच त्या ठिकाणच्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था मंदिरामध्ये केली आहे. यानंतर रिक्टोली गावांमध्ये इंदापूर येथे भेगा पडल्या आहेत. सत्तर ते ऐंशी कुटुंबांची व्यवस्था दुसऱ्या शाळेमध्ये केली आहे. तिवडी या गावाकडे जाण्याचा रस्ता वाहून गेल्यामुळे संपर्क तुटला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत.