शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे २९ पासून उपोषण

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

विविध मागण्या : अल्प मानधनाविरोधात आता संघर्षाचा लढा...

रत्नागिरी : ग्रामपंचायतीसाठी डाटाएंट्री आॅपरेटर्स म्हणून गेली तीन ते साडेतीन वर्षे कार्यरत असताना त्यांना दिले जाणारे मानधन तुटपूंजे आहे. विविध मागण्यांसाठी डाटा आॅपरेटर्स दीड महिन्यापासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यव्यापी आंदोलन सुरू असतानाही शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय करार संपुष्टात आणण्याचे एसएमएस पाठविण्यात येत असल्याने डाटा एन्ट्री आॅपरेटर्स दि.२९ पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालक मानधनाचा विषय मांडण्यात आला होता. इतकेच नव्हेतर राज्य संघटनेची बैठकही झाली होती. आंदोलनास दीड महिना पूर्ण झाला असल्याने काही परिचालकांना महाआॅनलाईन कंपनीने सेवा करार संपविल्याचे लेखी पत्र, एसएमएस पाठविले आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांच्याशी परिचालकांनी संपर्क साधला असता असे कोणतेही निलंबन होणार नसल्याचे सांगितले. सध्या कार्यरत असलेल्या परिचालकांना काढून टाकून त्यांच्या जागी नवीन परिचालकांची नियुक्ती केली जाणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज्यातील सर्व परिचालकांचे मानधन वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.परंतु संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. महाआॅनलाईनबरोबरचा करार संपुष्टात करावा व परिचालकांना शासनसेवेत समाविष्ट करावे, तसेच मान्य केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात शासनाने द्याव्यात, असे राज्यसंघटनेचे म्हणणे आहे. दि.२९ रोजी आझाद मैदानावर सर्व संगणक परिचालक उपोषणास बसणार आहेत. (प्रतिनिधी)राज्यव्यापी आंदोलन सुरु असताना शासनाकडून निर्णय होत नसल्याने संगणक परिचालक संतप्त.आझाद मैदानावर सोमवारपासून करणार उपोषण.आंदोलनाला दीड महिना पूर्ण.परिचालकांचे निलंबन न करण्याचे ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन.