शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेततळ्याचे काम शून्य

By admin | Updated: October 12, 2014 00:51 IST

मग्रारोहयो : २४७ शेततळी बांधण्याचे उद्दिष्ट कागदावरच

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत जिल्ह्यात २४७ शेततळी बांधण्यासाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ मात्र, अर्धे वर्ष उलटले तरी जिल्ह्यात एकही शेततळीचे काम करण्यात आलेले नाही़ मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ या योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, सामूहीक शेततळे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे आदी कामे वृक्ष लागवड व शेतीसाठी घेण्यात येतात़ त्यामुळे बारमाही शेती करण्याच्या दृष्टीने शेततळीचा वापर करता येऊ शकते़ त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यासाठी जिल्ह्यात २४७ शेततळीची कामे घेण्यात येणार होती़ त्यासाठी सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये जिल्ह्यात २४७ कामांसाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ सन २०१४-१५ च्या मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये कोटीची उड्डाणांचे कागदावर नियोजन करण्यात आले असले तरी एकही काम नाही़ त्यामुळे योजनेचा आराखडाही कागदावरच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे़ (शहर वार्ताहर)तालुकागाव तळींची कामेमंडणगड ०१दापोली २१खेड ६७चिपळूण ६८गुहागर १२संगमेश्वर १६रत्नागिरी ००लांजा २०राजापूर ४२एकूण२४७