शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नकन्यांच्या यशाची प्रसिध्दी नक्कीच कौतुकास्पद : संदीप तावडे

By admin | Updated: April 20, 2016 01:27 IST

या ‘यशवंत’ मुलींचे कौतुक करण्यात ‘लोकमत’चा वाटा महत्त्वाचा आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सुरुवातीच्या काही काळात क्रीडा क्षेत्रामध्ये मागास जिल्हा म्हणून ओळखला जात असे. मात्र, आताच्या खेळाडूंनी आता तो इतिहास पुसून टाकला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवत आहेत. या ‘यशवंत’ मुलींचे कौतुक करण्यात ‘लोकमत’चा वाटा महत्त्वाचा आहे. एखाद्या दैनिकाने स्वत: दखल घेऊन रत्नकन्यांचे यश प्रसिध्द करणे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो संघाचे स्पर्धा निरीक्षक व जिल्हा खो - खो संघटनेचे सचिव संदीप तावडे यांनी केले. ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘यश रत्नकन्यांचे’ मालिकेतील खेळाडू व भारताची सुवर्णकन्या ठरलेल्या ऐश्वर्या सावंत हिचा ‘लोकमत’ परिवारातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संदीप तावडे यांनी कौतुकोव्दार काढले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर, पंकज चवंडे, सूरज आयरे, ऐश्वर्याचे वडील यशवंत सावंत, रत्नकन्या ऐश्वर्या सावंत, श्रध्दा लाड, धनश्री लाड, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, सोनिया भोसले, तन्वी कांबळे आदी मंडळी उपस्थित होती.खेळाडू विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तावडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचेही आवाहन केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी वर्तमानपत्राचे वाचन महत्त्वाचे आहे. मोबाईल करमणूक म्हणून चांगला असला तरी सातत्याने वेळ काढून वर्तमानपत्र वाचून दैनंदिन घडामोडींबरोबर अन्य माहिती संकलित केली पाहिजे. मेहनत, जिद्द व परिश्रमातून असे यश मिळवा की, भविष्यात तुम्ही कोणाचे तरी ‘आयडॉल’ बना, असेही सांगितले. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.मार्गदर्शक विनोद मयेकर व पंकज चवंडे यांनीही ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. धनश्री लाड हिने सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)‘लोकमत’कडूनच दखलराष्ट्रीय आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २९ रत्नकन्यांच्या कौतुकाची मालिका केवळ ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. हे कौतुक खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देईल, अशा शब्दात संदीप तावडे व व अन्य क्रीडा शिक्षकांनी ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन केले.