शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसातही वाळूचे उत्खनन

By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST

खेड तालुका : राजकीय हस्तक्षेप झाल्याची जोरदार चर्चा

खाडीपट्टा : तालुक्यातील खाडीपट्टा भागात खेड महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने भरपावसाळ्यातही वाळूचे उत्खनन सुरुच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या वाळू उत्खनन प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे महसूल यंत्रणादेखील कुचकामी ठरत आहे. बुधवारी (१३ रोजी) खाडीपट्ट्यातील भागात बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करुन त्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या शहरातील क्षेत्रपालनगर येथे प्रांताधिकाऱ्यांनी पकडल्या. गेले काही दिवस ‘लोकमत’ने याप्रकरणी प्रकाशझोत टाकल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करण्याचा हा देखावा केल्याची चर्चा खेड शहर परिसरात रंगली आहे.गेल्या तीन वर्षांपासून वाळू उत्खननावर बंदी असताना गेले काही महिने तालुक्यातील खाडीपट्टा भागातून जगबुडी, दाभोळ खाडीतून वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. पावसाळ्यात वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करुन ठेवलेला आहे. काही ठिकाणी उत्खनन होत असल्याचेही समोर येत आहे.खाडीपट्ट्यातील वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने शहरातील क्षेत्रपालनगर येथे पकडण्यात आली. ही दोन्ही वाहने तहसील आवारात आहेत. याबाबत खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता ही वाळू खाडीपट्ट्यात साठवण करुन ठेवण्यात आल्याचे ट्रक चालकाने आपल्या जबाबात म्हटले आहे. याची संपूर्ण चौकशी करुन संबंधित मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. (वार्ताहर)पकडण्यात आलेली वाळू ही खाडीपट्ट्यात साठवण करुन ठेवलेली होती. असे ट्रकचालकाने आपल्या जबाबात म्हटले आहे. यासंबंधी संपूर्ण चौकशी करुन संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- प्रकाश संकपाळ, तहसीलदार खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागात भर पावसात वाळू उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष.खाडीपट्ट्यातील अशा अनधिकृत उत्ख़ननाविरूध्द महसूल अधिकाऱ्यांकडून कारवाईचा केव केला जातोय फार्स. कारवाईचा फार्स नको.