शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवासाठी सर्वांचे सहकार्य हवे

By admin | Updated: April 23, 2016 00:28 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरी पर्यटन महोत्सव नियोजनाबाबत चिपळूण येथे बैठक

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने घेण्यात येणारा रत्नागिरी पर्यटन महोत्सव यावर्षी चिपळूण शहरातील पवन तलाव येथे ७ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. यावेळी कोकणातील विविध पैलूंचे दर्शन घडविले जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी एका मतदारसंघात करण्याचे नियोजन आहे. गेल्यावर्षी रत्नागिरीत झाला, तर यावर्षी तो चिपळूणमध्ये होत आहे. आमदार सदानंद चव्हाण व उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला उत्सव समजून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री वायकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्य कार्यकारी अधिकारी पुसाळकर, उपविभागीय अधिकारी हजारे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गुहागरचे सभापती विलास वाघे, मंडणगडचे सभापती रेवाळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवात कोकणातील कला संस्कृतीचे दर्शन, निसर्ग अभ्यास, आमराई सफर, अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स, रॉक क्लायविंग, क्रोकोडाईल सफारी, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर क्रॉसिंग, बर्मा ब्रिज, झॉरबी बॉल आदी विविध उपक्रम तसेच भविष्यातील पर्यटन विषयावर चर्चासत्र होणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात ७ मे रोजी शोभायात्रेने होईल. त्यानंतर आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व रांगोळी स्पर्धा होणार आहेत. ८ रोजी कोकणी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा, दि. ९ रोजी पुष्परचना स्पर्धा आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)