शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवक समितीची स्थापना

By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST

तंटामुक्त समितीचा उपक्रम : कोळोशीत नऊ जणांना ओळखपत्र वाटप

नांदगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले चोरीचे प्रमाण, ठिकठिकाणी आग लागून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान तसेच गावच्या वार्षिक उत्सवात लागणारी स्वयंसेवकांची गरज ओळखून महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोळोशीने सोमवारपासून नऊजणांच्या स्वयंसेवक समितीची स्थापना केली आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला वेताची काठी व ओळखपत्र वाटप करून एक जागृत उपक्रम हाती घेतला.वाढत्या चोरीच्या प्रमाणाला आळा बसावा, पोलीस यंत्रणेला ग्रामस्थांची साथ मिळावी व गावाच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेऊन काम करावे यासाठी तंटामुक्त ग्राम समिती कोळोशीने नऊ सदस्यांना ओळखपत्र व वेताच्या काठीचे वाटप केले. हे सदस्य गावातील प्रत्येक वेळप्रसंगाला गावातील लोकांच्या मदतीसाठी काम करणार आहेत. याशिवाय या पथकाकडून कुठे आग लागली तर पथकातील सदस्य ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करणार तसेच गावात होणारे वार्षिक उत्सवाच्यावेळी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडणार आहेत.यावेळी समितीचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी, सरपंच सुशील इंदप, उपसरपंच कृपाली इंदप, ग्रामसेविका एम. ए. लाड, पोलीस पाटील संजय गोरूले, दादा कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या काही दिवसात या पथकाला बॅटरी व शिट्ट्या वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)रात्रीची गस्त ठेवणाररात्री-अपरात्री गावात फिरणारी संशयित व्यक्ती, वाहन यांच्यावर नजर ठेवून अशा वाहनांची व व्यक्तींची या पथकाकडून चौकशी होणार आहे. संशयित व्यक्ती आढळल्यास त्याला पकडून त्याची माहिती पोलीस पाटलांमार्फत पोलीस स्थानकात देणार असल्याचे सांगण्यात आले. तंटामुक्ती समितीच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यामुळे चोऱ्यांना चाप बसणार आहे.फेरीवाल्यांवर करडी नजरजिल्ह्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात चादर विक्रेते व इतर फेरीवाले फिरत असतात. यामधील सर्रास फेरीवाले हे दुसऱ्या राज्यातील असून टोळक्या- टोळक्याने फिरत असतात. त्यांच्याकडे कोणताही पुरावा किंवा त्यांची पोलीस स्थानकात नोंद नसते. अशांची चौकशी करून गावात फिरण्यास या पथकाकडून अटकाव करण्यात येईल व पोलिसांना कळविण्यात येईल.