शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एन्रॉन ते रिफायनरी व्हाया बारसू सेटिंगबहाद्दर एनजीओ कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम वाजायला लागल्याने हमखास मुंबईतील एनजीओ दाखल होतील. त्यांचा रोखठोख समाचार घेण्यासाठी आमच्यासोबत सज्ज रहा, असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिला आहे.

काझी हे बारसू भागातील बागायतदार असून, गोवळ-शिवणे-बारसू रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधून एनजीओंच्या कारवायांबाबत भूमिका मांडली. गावाबाहेरील एनजीओचे सदस्य व त्यांनी निर्माण केलेल्या संघर्ष समित्यांपासून कोणताही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतीर्ण होतात, हा इतिहास आपण एन्रॉनपासून अगदी सलग जिंदल, फिनोलेक्स, आयलॉग, नाणार रिफायनरी इत्यादी प्रकल्पांपर्यंत सलगपणे पाहतो आहोत. आता बारसू येथे सरकारने कोणतीही रिफायनरी जाहीर केलेली नसताना संघर्ष समिती स्थापन करण्याची चढाओढ या एनजीओने लावलेली आहे. यांचा उद्देश हा प्रकल्प कंपन्यांबरोबर सेटिंगचा असतो, हे आता लपून राहिलेले नाही. जे आरोप अणुऊर्जा प्रकल्प, जिंदल, फिनोलेक्स तसेच अगदी आयलॉग जेटी प्रकल्पांकरिता लावण्यात आले, तेच आता बारसू - सोलगावच्या ग्रामस्थांना रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सांगण्यात येतील, असे काझी यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्पामुळे आम्लयुक्त पावसाची अफवा पसरवली जात आहे. मुंबईमध्ये मागील ७० वर्षे दोन रिफायनरी कार्यरत आहेत. या कालावधीत मुंबईत आम्लयुक्त पाऊस पडल्याची कुठेही नोंद नाही, परंतु याचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात हजारो टन कोळसा जाळला जाईल व राख पसरेल, अशी यांची पत्रके फिरू लागली आहेत. मुंबईत असलेल्या दोन रिफायनरी प्रकल्पांतून मागील ७० वर्षांत राख कोठे पसरली? याचे उत्तर एनजीओंकडे नाही. माहुल येथील रिफायनरीच्या बाजूच्या झोपडपट्टी पुनर्वसन सोसायटीतील अव्यवस्थेचे दर्शन आता घडवले जाईल व त्याचे खापर रिफायनरीवर फोडले जाईल. मात्र, ही सोसायटी २०१२ साली अस्तित्वात आली तर रिफायनरी १९५२ साली अस्तित्वात आली. या रिफायनरीच्या आजूबाजूला असलेल्या इतर ५० ते ६० सोसायटींमधील सुंदर परिसराचे दर्शन घडवले जाणार नाही मात्र एकाच गलिच्छ सोसायटीतील अवस्थेचे चित्रण करून ग्रामस्थांना भडकावले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतरतात. हा इतिहास आपण पुसण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा इशारा काझी यांनी दिला आहे. नाणारमध्ये रिफायनरी नको तर ४२ उद्योग आणणारे दलाल आज कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.