शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे धरणांत पुरेसे पाणी

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ लघु व एक मध्यम अशा एकूण २३ पाटबंधारे धरण प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्व धरण प्रकल्पात ७० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, सरासरी पाणीसाठा ७२.३० टक्के आहे. या सर्व धरणांतील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स असून, पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या हंगामात पावसाने सुरुवातीला दडी मारून सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले होते. सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरणार काय, असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतीचे व काही गावच्या नळपाणी योजनांचे काय होणार, याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उशिराने चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, अन अनेक धरणे भरली. त्यावेळीच निर्माण झालेली भीती दूर झाली होती. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच या धरणांमुळे परिसरातील गावच्या विहिरींच्या पाण्याचीही योग्य पातळी राखली जाते. २२ डिसेंबर २०१४ या तारखेपर्यंत पाणी साठ्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर (सर्व चिपळूण), शिरवली (खेड), तेलेवाडी (संगमेश्वर) या धरणांचा समावेश आहे. यातील तेलेवाडी व आंबतखोल धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, २३ पैकी कोंड्ये, गवाणे व निवे या तीन पाटबंधारे धरण प्रकल्पातील पाणीसाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या भागात उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. केळंबा व बारेवाडी या धरणांची स्थिती चांगली नसल्याने त्या धरणांमध्ये पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. या धरणांच्या दुुरुस्तीचे कामही गेल्या वर्षी सुरू होते. सात धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर ६ धरण प्रकल्पांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांत मिळून सध्या ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)