शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

राजापूर : राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे रद्द झालेले ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

राजापूर : राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे रद्द झालेले ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समिती राजापूरतर्फे शासन प्रशासनाला देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संस्थगित केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने लवकरात लवकर पुनर्प्रस्थापित करावे, राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, पदोन्नती कोट्यातील मागासवर्गीयांची ३३ टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, शासकीय सेवांमधील ओबीसींचा अनुशेष विनाविलंब भरण्यात यावा, बिंदुनामावलीला दिलेली स्थगिती उठवावी यांसह अन्य मागण्यांबाबत गुरुवारी ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे तहसीलदार कार्यालयासमाेर निदर्शने केली.

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, राजापूर तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाबाहेर हे आंदोलन छेडण्यात आले. जोपर्यंत ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आगामी निवडणुका होऊ देणार नाही, असा परखड इशारा यावेळी देण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अग्रेशीत करण्यात आलेले आपल्या विविध मागण्यांचे निवेदन समन्वय समितीतर्फे निवासी नायब तहसीलदार अशोक शेळके यांना सादर करण्यात आले.

यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समिती राजापूरचे अ‍ॅड. शशिकांत सुतार, सरचिटणीस मनोहर गुरव, रवींद्र नागरेकर, प्रकाश मांडवकर, महेश शिवलकर, अनामिका जाधव, नरेश शेलार, दीपक नागले, तुकाराम बावदाणे, अ‍ॅड. राजन देवरूखकर, अ‍ॅड. सुनील मेस्त्री, रविकांत मटकर, संतोष हातणकर, प्रकाश पुजारे, राजू कार्शिंगकर आदींसह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश बाईत यांनी केले, तर आभार चंद्रकांत बावकर यांनी मानले.

----

ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे नायब तहसीलदार अशोक शेळके यांना चंद्रकांत बावकर, दीपक बेंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.