शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अर्जही आॅनलाईन

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

शक्तीप्रदर्शनाच्या उधाणाला निवडणूक आयोगाचा चाप

रत्नागिरी : निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरणे अनिवार्य केले असून, आता उमेदवार अगदी घरबसल्या आपला अर्ज आॅनलाईन भरणार आहेत. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे शक्तीप्रदर्शनालाही चाप बसणार आहे. आता अगदी ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकाही प्रतिष्ठेच्या केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीसाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करूनच अर्ज भरला जात असे. मात्र, आता निवडणूक आयोगाने शक्तीप्रदर्शनाला चाप लावला आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला आपला अर्ज आॅनलाईन सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे त्याचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी अर्जदारांकडून कशा प्रकारे अर्ज आॅनलाईन भरून घेणे अपेक्षित आहे, हे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २३ रोजी निवडणुका होत आहेत. त्यासाठी ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरावे लागणार असल्याने या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता महा-ई सेवा केंद्रात अर्ज भरावा लागणार आहे किंवा निवडणुका असलेल्या दापोली, खेड आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांतील पंचायत समितीमध्ये त्यांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र, आयोगाने ग्रामस्तरावरूनच आॅनलाईन अर्ज अनिवार्य केल्याने शक्तीप्रदर्शनात होणाऱ्या खर्चावरही आता नियंत्रण येणार आहे. (प्रतिनिधी)