शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरतावादाची पाळंमुळं आर्थिक, राजकीय सत्तेत : काॅ. किरण मोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक-राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता ...

रत्नागिरी : कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक-राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता काबीज करणं हा कट्टरतावादाचा हेतू आहे, धर्म केवळ निमित्तमात्र आहे, असे प्रतिपादन काॅ. किरण मोघे यांनी शहीद गौरी लंकेश यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डाॅ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांका’च्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात केले. त्या ‘कट्टरतावादाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आव्हान’ ह्या विषयावर बोलत होत्या.

कट्टरतावादामुळे महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कृष्णवर्णीय यांचे मानवी अधिकार हिरावले जाऊन त्यांचे जगणं मुश्कील होतं, या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांकाचे प्रकाशन डाॅ. शैलाताई दाभोलकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शैलाताई म्हणाल्या, डाॅ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर व कोविड काळात आपल्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र, तुम्ही सर्वांनी त्यावर केलेली मात मी पाहिली आहे. विचाराला कृतीची जोड असली पाहिजे, यासाठी डाॅ. दाभोलकर आग्रही होते. त्याचे दर्शन या अंकातून घडत आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात असते तर त्यांनाही तुमचे कौतुक वाटले असते, असेही त्या म्हणाल्या.

प्रमुख वक्त्या काॅ. किरण मोघे यांनी कट्टरतावाद कसा पेरला जातो, त्याचा आर्थिक राजकीय हितसंबंधासाठी कसा वापर केला हे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या तालिबानी दहशतवादाची उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

भारतातील कट्टरतावादाविषयी बोलताना काॅ. किरण मोघे म्हणाल्या, ‘डॉ. दाभोलकर, काॅ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याही याच कट्टरतावाद्यांनी थंड डोक्याने, नियोजनबद्धपणे केल्या आहेत. या चौघांसारखे इतर अनेक सर्वसामान्यही या कट्टरतावादाचे बळी आहेत. २०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्यात पहिले माॅब लिन्चिग मोहसिन शेख यांचे झाले. त्यानंतर अशा इतक्या घटना घडल्या आहेत की अशा घटनांबाबत आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. इतके निर्ढावलेपण कट्टरतावादाने आपल्यात निर्माण केले आहे. यावर उपाय म्हणजे जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी एकजूट करून कट्टरतावादाला सत्तेपासून दुर ठेवले पाहिजे तसेच वास्तव समजून घेण्यासाठी आपला अभ्यास, वाचन वाढविले पाहिजे’, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात विनोद वायंगणकर यांनी चळवळीचे गीत म्हणून केली. वक्त्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रभाकर नानावटी यांनी केले. सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले.