शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मद्याची वाहतूक करणारा अटकेत

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

राज्य उत्पादन शुल्कची मोहीम : राजापूर तालुक्यातील ओणी येथे पथकाची कारवाई

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करताना पिकअप गाडीसह १५ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, रत्नागिरीने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमाराला राजापूर तालुक्यातील ओणी येथे केली. याप्रकरणी पिकअप चालकाला अटक करण्यात आली. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शनिवारी पहाटेपासून मुंबई - गोवा महामार्गावर गस्त घालत असताना राजापूर तालुक्यातील ओणी गावच्या हद्दीमध्ये पिकअप (एमएच-०७ पी-२१८६) ही गोव्याहून येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीला मिळाली होती. पिकअप गाडी चालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना त्याचा संशय आला. वाहनावरील ताडपत्री बाजूला करून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले एकूण १७२ बॉक्स आढळून आले.याबाबत वाहनचालक महमद रखांगी (२४, रा. बांदा, ता. सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह, पिकअप गाडी मिळून एकूण १५ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय तवसाळकर, दीपक वायंगणकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, शामराव पाटील, अतुल पाटील, महेश शेवडे, शंकर जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातीसकर, सुनील चिले, राजेंद्र शेट्ये तसेच जवान सुरेश शेगर, विशाल विचारे, अनुराग बर्वे, राजेंद्र भालेकर, वैभव सोनावले, मलीक धोत्रे, चक्रपाणी दहीफळे, निनाद सुर्वे, शेख, वड, मिलिंद माळी, जगन चव्हाण, दत्तप्रसाद कालेलकर तसेच महिला जवान अनिता डोंगरे व मयुरी चव्हाण यांच्या पथकाने केली. (वार्ताहर)नाताळ सण व ३१ डिसेंबरनिमित्त गोवा बनावटीचे विदेशी मद्य मोठ्या प्रमाणावर मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होत असते. ही वाहतूक रोखण्यासाठी बांदा ते कशेळी घाट या दरम्याने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची विशेष पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.- संतोष झगडे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी