शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

चायनीज सेंटर्सकडे प्रमाणपत्रच नाही?

By admin | Updated: August 24, 2014 22:38 IST

खेड तालुका : शासनाचे नियम धाब्यावर

खाडीपट्टा : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या चायनीज हॉटेल्स मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली असून, ती फक्त ग्रामपंचायतीच्या परवानगीने चालू असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. वास्तविक चायनीजसारखा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा ना हरकत दाखला सक्तीचा असल्याचा शासनाचा नियम आहे. मात्र, सध्या ग्रामीण भागात चालू असणारे शाळेजवळ किंवा बसस्थानकाजवळ हॉटेल्स, चॉयनीज चालवणाऱ्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वत्र प्रदूषण व आता चायनीजसारखे अतिजलद मसाले वापरणारे खाद्यपदार्थ यामुळे खाणाऱ्यांमध्ये रोग पसरण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात ताप, टी. बी. यांसारख्या रोगाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडे कोणतेही आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र तसेच अन्न व औषध प्रशासनाचे ना हरकत दाखले नसल्याने तो विकणारा नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. याबाबत तहसीलदार खेड यांच्याशी संपर्क साधला असता शहरासह ग्रामीण भागातील सर्व हॉटेल्स, चायनीज स्टॉल्सची तपासणी करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खाडीपट्ट्यातील मंडल अधिकारी परवानगीच्या नावावर मारताहेत चायनीजच्या पदार्थावर ताव व कागदपत्राच्या तपासणीच्या नावावर कागदपत्र ताब्यात घेऊन चायनीज मालकांवर कारवाईच्या नावावर आपला स्वार्थ साधत आहेत, असे एका चायनीज मालकाने सांगितले. चायनीज पदार्थावर खवैय्ये ताव मारतात. मात्र, हे पदार्थ करण्यासाठी त्यास आवश्यक तो परवाना गरजेचा आहे. मात्र, अनेक ठिकाणी तो घेतलेला दिसत नसल्याने त्याबाबत कोणती कार्यवाही करणार असा प्रश्न विचारला जात आहे. खेडचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील सर्व हॉटेल्स, चायनीज स्टॉल्सची पाहणी करणार असल्याचे यावेळी सांगितले. (वार्ताहर) हॉटेल्स, चायनीज आदी खाद्य पदार्थ विकणाऱ्या मालकांकडे अन्न व औषध प्रशासनाचे नाहरकत दाखल्याशिवाय परवानगी देता येत नाही. मात्र, आम्ही फक्त सांडपाणी आदीसह इमारतीबाबत चौकशी करतो. मात्र, दोषींवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार तहसीलदारांना आहेत. - आर. एस. रेडेकर,आरोग्य सहायक, जिल्हा परिषद, रत्नागिरी