शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार होणार

By admin | Updated: February 8, 2015 01:04 IST

जलयुक्त शिवार अभियान : जिल्ह्यातील ४५ गावांची निवड

रत्नागिरी : ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्यात सतत उद्भवणारी पाणीटंचाई विचारात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारा निधी, मनरेगा निधीचाही विनियोग करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, खासगी उद्योगांचे सीएसआरअंतर्गत सहकार्य, सहकारी संस्था आणि लोकसहभाग याचा विचार करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई समस्या सोडविणारी कामे हाती घेण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. राज्याच्या सिंंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करणे. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे. विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. अस्तित्त्वात असलेले व निकामी झालेल्या विविध स्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, अस्तित्त्वातील जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीवजागृती निर्माण करणे. शेतीच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे तसेच लोकसहभाग वाढविणे, अशा शाश्वत जलसंचयाला चालना देणाऱ्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सर्वांसाठी पाणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंटकाँक्रिट नाला बंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणासह करणे, जुन्या जलसंरचना कार्यान्वित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करणे. पाझर तलाव, लघुसिंंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)