शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांची होतेय हेतुपुरस्सर हेळसांड

By admin | Updated: December 2, 2014 00:23 IST

खेड आगार : एस. टी.कडे ‘व्हील चेअर’ही उपलब्ध नाही

खेड : विविध कारणांनी दिवसेंदिवस होत असलेली महागाई आणि वाढते प्रवासी दर यामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस. टी. बस ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र, खेड आगारामध्ये याच सर्वसामान्य अपंगांना बसमध्ये चढउतार करताना किंवा बसस्थानकामध्ये बसपर्यंत जाण्यासाठी ‘व्हीलचेअर’ उपलब्ध नसल्याने हेळसांड होत आहे. खेड आगार त्याबाबत आजही अपंग असल्याचे मत व्यक्त करीत येथील शेकडो अपंगांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अपंगांसाठी एस. टी. आगारप्रमुखांनी ‘व्हील चेअर’ही उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही.जिल्ह्यातील नऊ आगारांपैकी केवळ चिपळूण आगारात ‘व्हील चेअर’ची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित आगारात ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वृध्द आणि अपंग रूग्ण प्रवाशांना आपल्या नातेवाईकांवरच विसंबून राहावे लागत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत चिपळूण आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रमात सहभागी होत असलेल्या संस्थेनेच ही ‘व्हील चेअर’ उपलब्ध करून दिली आहे़ तसेच चिपळूण येथील कोकण रेल्वे स्थानकातदेखील ही ‘व्हील चेअर’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. याखेरीज एकाही आगारामध्ये ही सुविधा नसल्याने अपंगांसह वृध्दांचीही मोठी पंचाईत झाली आहे़ आजही एस. टी.मध्ये आसन क्रमांक ४ ते ६ ही अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत़ असे असले तरीही गर्दीच्या वेळी आणि घाईघाईमध्ये या अपंगांना गाडीमध्ये चढउतार करताना अवघड होते. त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक हे इतर प्रवाशी चढल्यानंतर किंवा उतरल्यानंतर त्यांना गाडीत चढवतात व उतरवितात़ अशा वेळी बसस्थानकामध्ये ‘व्हील चेअर’ असल्यास याच अपंगांना चढणे किंवा उतरणे सुलभ होणार आहे़ पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आगारांमध्ये अशी सुविधा पाहण्यास मिळते़ तेथील अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तेथील अपंगांसह वृध्द आणि रूग्णांना या सुविधेद्वारे न्याय दिला आहे़ रत्नागिरी विभागामध्ये दरारोज सर्वसाधारणपणे ७५२ एस. टी. बसेसच्या जवळपास ४ हजार ५६० फेऱ्या होतात़ या फेऱ्यांदरम्यान प्रत्येक बसस्थानकामध्ये निदान एक तरी अपंग, रूग्ण किंवा वृध्द हा प्रवासी म्हणून निश्चितच एस. टी.च्या प्रतीक्षेत असतो. अशावेळी या प्रवाशांना ‘व्हील चेअर’ नसल्याने त्यांना बसमध्ये चढणे किंवा उतरणे अवघड होते़ याकरिता प्रत्येक बसस्थानकामध्ये एक तरी ‘व्हील चेअर’ असावी. (प्रतिनिधी)