शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट

By admin | Updated: November 10, 2014 23:53 IST

रत्नागिरी नगर पालिका : रत्नागिरीत चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमधील राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून त्यांच्या सहाही नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांकडून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याने नगर परिषदेतील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. आज रत्नागिरी नगर परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून, १३ नगरसेवक आहेत, तर भाजपा ८, राष्ट्रवादी ६ आणि काँग्रेस १ अशी नगरसेवकांची संख्या आहे. गेली २५ वर्षे रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेना-भाजपा युती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्याने त्याचे परिणाम रत्नागिरी नगर परिषदेच्या राजकीय पटलावर झाल्याचे दिसून येत आहेत.युतीमध्ये ठरल्याप्रमाणे भाजपचे महेंद्र मयेकर नगराध्यक्ष आहेत. मात्र, आता युती तुटल्यानंतर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, उदय सामंत यांच्यापाठीमागून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक गट आधीपासूनच कार्यरत होता. त्याचा फायदा रत्नागिरी नगर परिषदेतील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला होणार हे जवळजवळ निश्चित आहे. दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेतील राजकीय घडामोडीना वेग आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाखाली वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नगरसेवक बाळू साळवी, नगरसेविका स्मितल पावस्कर, प्रीती सुर्वे आणि मुनीज जमादार यांचा समोवश आहे. नगरसेवक बाळू साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली चारही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी, दि. ११ रोजी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सहाही नगरसेवकांना चार नगरसेवकांचा गट स्थापन होण्यापूर्वी पक्षाकडून पक्षादेश बजावण्यात आला असल्याचे गटनेते नगरसेवक सुदेश मयेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र दिले. आपला गट उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे नगरसेवक बाळू साळवी यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे संजय साळवी उपनगराध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. (शहर वार्ताहर)शहर विकास आघाडीरत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले असून, आपल्या गटाला शहर विकास आघाडी असे नाव दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.