शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

वसतिगृह प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: April 20, 2016 22:13 IST

आयटीआय : आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत नाव आणि अभ्यासक्रमाचा समावेश नाही

रत्नागिरी : मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतिगृह आॅनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये रत्नागिरीमधील दोन आणि चिपळूणमधील एक अशा तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे व अभ्यासक्रम समाविष्ट नसल्याने या संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित राहावे लागत आहे. रत्नागिरी येथे मुलांसाठी तसेच मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. चिपळूण येथेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण भागातून आलेली असतात. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर राहायचे कुठे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसूनही यातील काही मुले ही भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. हा प्रश्न मिटणार कधी? असा सवाल केला जात आहे. रत्नागिरी शहरात समाजकल्याण विभागातर्फे मुलींसाठी एक आणि मुलांसाठी दोन अशी एकूण तीन वसतिगृह उभारण्यात आली आहेत. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी गतवर्षी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. परंतु, आॅनलाईन प्रणालीत या तीनही संस्थांची नावे व अभ्यासक्रम समाविष्ट न केल्याने या प्रणालीत ती दिसून येत नाहीत. त्यामुळे गतवर्षी सुमारे १०० विद्यार्थ्यांना वसतिगृहातील प्रवेशापासून मुकावे लागले होते. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने संपर्क करून ही अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या कार्यालयाने पुणे येथील सहआयुक्त कार्यालयाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहारही केला. मात्र, पुणे येथील कार्यालयाकडून अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता निदान यावर्षी तरी या गरजू मुला - मुलींना या वसतिगृहाचा लाभ मिळावा, यासाठी सहआयुक्त कार्यालयाने दखल घेऊन या तिनही संस्थांची नावे आणि अभ्यासक्रम वसतिगृह प्रवेश आॅनलाईन प्रणालीत समाविष्ट करावा, अशी मागणी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)