शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

दापाेली नगरपंचायतीतील सफाई कर्मचारी पगारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी ...

दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष परवीन शेख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सोमवार, दि. १२ जुलैपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यास दापोली शहरात भाजपतर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येईल व त्यातून जमा होणारी रक्कम नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे पगारासाठी जमा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दापोली नगरपंचायत येथे सुमारे ६० ते ७० अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचारी असून, त्यांचा मागील दोन महिन्याचा पगार नगरपंचायतीने दिलेला नाही. कोरोनाच्या काळात कार्यरत असूनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याची बाब माजी नगरसेवक संजय सावंत यांनी नगराध्यक्षा परवीन शेख यांना सांगितली. या कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतन असून जर दोनदोन महिने त्यांना पगारच मिळत नसेल तर कोविडच्या काळात त्यांनी कुटुंबासाठी खर्च तरी कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात बोलताना नगराध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून नगरपंचायतीला वेतनासाठी येणारे सहायक अनुदान वेळेवर येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता येत नाही. शहरात विकासाची कोणतीही कामे सुरू नसताना तीन-तीन अभियंते नगरपंचायतीने कशासाठी घेतले आहेत याची विचारणा स्वरूप महाजन यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सफाई कर्मचारी यांना पगार देण्यात येईल, असे नगरध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले. त्यावेळी दापोली नगरपंचायतीचा सर्व कारभार वरच्या मजल्यावरून (मुखाधिकारी यांच्याकडून) चालत असून, त्यावर नगराध्यक्ष यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला. यावेळी नगरसेविका जया साळवी, महिला मोर्चाच्या लीना शेठ, संदीप केळकर, अतुल गोंदकर, अजय शिंदे, स्वरूप महाजन, अ‍ॅड. ऋषिकेश भागवत, फझल रखांगे, संकेत कदम, शकील मणियार, कुणाल शिंदे, देवराज राठोड, दिप्तेश खटावकर उपस्थित होते.

------------------------------

आमदारांचाही विश्वास नाही

आमदार योगेश कदम यांनी मंजूर करून आणलेली शहरातील विकास कामे नगरपंचायतीकडे न देता ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. दापोली नगरपंचायतीच्या कारभारावर खुद्द आमदारांचाच विश्वास नसल्याचे दिसून येत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.