शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

देवरुखात ‘सप्तलिंगी’ बचाव

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

सृष्टी नेचर क्लब : गाळमुक्त नदीसाठी जिल्ह्यातील पहिली मोहीम

देवरुख : देवरुख शहरातून जाणारी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावून वांद्री येथे बावनदीला मिळणारी सुमारे १८ किलोमीटर लांबीची सप्तलिंगी नदी प्रदूषणापासून संरक्षित करण्याच्या हेतूने ‘सप्तलिंगी बचाव’ मोहीम राबवण्यात येत आहे. देवरुखमधील ‘सृष्टी नेचर क्लब’च्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.सृष्टी नेचर क्लब या संस्थेने जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला आहे. या मोहिमेची संकल्पना नेचर क्लब आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांच्या विचारातून पुढे आली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा, हरपुढे येथे २३ मे रोजी सकाळी या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सृष्टी नेचर क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध पर्यावरणविषयकतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी हे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीच्या पात्रातून पायी प्रवास करुन नदीचा पर्यावरणविषयक तसेच अन्य बाबींविषयक अभ्यास करुन त्याच्या नोंदी करण्यात येणार आहेत.तसेच या नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने विविध योजना राबवण्यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सृष्टी नेचर क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.नदीच्या उगमापासून तळेकांटे येथील बावनदीच्या संगमापर्यंत नदीपात्रातून प्रवास करणे, नदीतील प्रदूषणकारी घटकांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील पाण्याची पातळी तपासणे, नदीकाठच्या विविध पाणीपुरवठा योजनांची माहिती संंकलीत करणे, नदीतील बंधारे, डोह व नदी पात्रात साचलेला गाळ यांच्या नोंदी करणे, नदीकाठच्या विविध वनस्पती व वृक्ष यांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील मत्स्यजीव व अन्य प्राणीजीवन यांचा अभ्यास करणे, हे या मोहीमेचे उद्देश आहेत.त्याचबरोबर सप्तलिंगी नदीला मिळणाऱ्या अन्य उपनद्या व पऱ्ये यांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती संकलीत करणे. संबंधित गावाच्या प्रमुखांना ते प्रदूषण सुरु करण्यासाठी जबाबदारी देण्यात येणार आहे.मानवी कारणामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नदीच्या दोन्ही बाजूच्या जनतेला माहिती देऊन त्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबद्दल आग्रह धरण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)तीन दिवसांची योजनादरम्यान, सृष्टी नेचर क्लबतर्फे राबवण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम ठरला आहे. खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेला आहे.