शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत रंगला पालखी महोत्सव

By admin | Updated: March 3, 2015 22:18 IST

‘साईसेवा’चा उपक्रम : लोककला जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न

दापोली : कोकणातील लोप पावत चाललेल्या लोककलांची नवीन पिढीला ओळख व्हावी, पारंपरिक कलेचे प्रदर्शन व्हावे या हेतूने साई सेवा केंद्र दापोलीचे अध्यक्ष सुहास खानविलकर यांनी ८ वर्षांपूर्वी पालखी महोत्सवाची सुरूवात केली होती. गेली आठ वर्षे एकाच ठिकाणी कोकणातील लोककलेबरोबरच विविध देवदेवतांच्या पालख्या नाचवल्या जात आहेत.शहरातील गाडीतळावरील धर्मशाळेच्या प्रांगणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालख्या सतत गेली आठ वर्षे नाचवल्या जात आहेत. पाऊस कितीही विघ्न आले तरीही भाविक आपल्या देवदेवतांची पालखी घेऊन वाजत गाजत गावातून निघतात. देवदेवतांची पालखी मोठ्या भक्तीभावे दापोलीत आणली जाते. सकाळपासून दापोलीत वाजत गाजत पालख्या यायला सुरुवात होतात. जवळच्या पालख्या सकाळी आदल्या दापोलीत दाखल होतात. मात्र, लांबच्या पालख्या आदल्या दिवशी रात्री मुक्कामी दापोलीत दाखल होतात. सर्व पालख्या दापोली शहरातील मराठा बोर्डिंग येथे एकत्र येतात. येथे पालख्या ठेवून एकत्रित पूजा केली जाते. साईसेवा पालखी महोत्सवात वाऱ्याच्या वेगाने काळकाईदेवी दापोली, देवी पद्मावती वणंद, श्रीदेवी रणभैरी आपटी (मराठवाडी), श्री देव भैरवनाथ ताडील, भैरवनाथ सारंग, श्रीदेव खेम दळखण, श्रीदेवी चंडिका जुने देऊळ खेर्डी, श्रीदेवी चंडिका नवीन मंदिर खेर्डी, श्रीदेवी रण भैरी आपटी, श्रीदेवी महामाई ताडील सुरेवाडी, श्रीदेव धावजी कळंबट, श्रीदेव भैरी साकुर्डे, श्रीदेवी कालेश्वरी आमखोल रावतळे ,श्रीदेव रवळनाथ, रत्नागिरी या पालख्या नाचल्या. (प्रतिनिधी)