शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीला गालबोट, एकाचा मृत्यू

By admin | Updated: August 18, 2014 23:33 IST

दापोलीत प्रौढाचा मृत्यू, रत्नागिरीत एक जखमी, इतरत्र उत्साहात

रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्हा बाळा...’ या गाण्याच्या तालावर जिल्हाभरात जल्लोष सुरू असताना दापोली आणि रत्नागिरीतील दुर्घटनांनी गोपाळकाल्याला गालबोट लावले. दापोली तालुक्यातील नानटे गावी दहीहंडी फोडताना पडून बबन उमासरे (५७) यांचा मृत्यू झाला तर रत्नागिरीत परटवणे विभागात दहीहंडी फोडताना अमृत शिर्के (२७) हा तरूण खाली पडून जखमी झाला.हंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या बबन उमासरे यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता मृत्यू झाला. रत्नागिरीत जखमी झालेल्या शिर्के या तरूणाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी मिळून ३५६० दहीहंड्या फोडण्यात आल्या. राजकीय पक्षांनीही काही दहीहंड्या पुरस्कृत केल्या होत्या. बक्षिसे मिळविण्यासाठी बाहेरगावहून अनेक गोविंदा पथके खास गाड्या करून आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात ३९२ सार्वजनिक, तर ३१६९ खासगी दहीहंड्या रात्री उशिरापर्यंत फोडण्यात आल्या.रत्नागिरीत मारूती मंदिर, साळवी स्टॉप, नाचणे, मध्यवर्ती बसस्थानक, मांडवी किनाऱ्यावरील दहीहंडी पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती. दहीहंडीच्या ठिकाणी सर्वत्रच खास गोविंदाची गाणी वाजत होती. अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये बालगोपालही दंहीहंडीचा आनंद घेत होते. (प्रतिनिधी)