शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

दापोली : शुक्रवार, २ जुलैपर्यंत दापोलीतील ८९ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ४ टक्के रुग्णांनी प्राण गमावल्याचे दापोली ...

दापोली : शुक्रवार, २ जुलैपर्यंत दापोलीतील ८९ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ४ टक्के रुग्णांनी प्राण गमावल्याचे दापोली आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दापोलीत एकूण ४ हजार १९६ रुग्ण सापडले. यातील ३ हजार ७७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या २४८ रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हद्दवाढीला अंतिम मंजुरी

दापोली : दापोली नगर पंचायतीच्या ऑनलाईन झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत नगर पंचायत हद्दवाढीला अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे नगर पंचायतीची हद्दवाढ आता निश्चित मानली जात आहे. या सभेत काळकाई मंदिर सभामंडप, मेहता पेट्रोल पंपाजवळील जागा सुशोभिकरणाला परवानगी देण्यासह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

रस्ता अपूर्णच

रत्नागिरी : रत्नागिरीत विकसित होत असलेल्या विमानतळाकडे रत्नागिरीहून मजगावकडे जाण्यासाठी एमआयडीसीतून रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम अजूनही अपूर्णावस्थेत असून, त्यावर डांबराचे दोन थर मारले जाऊन तो पक्का केला जाणार असल्याचे उद्योजक रवींद्र सामंत यांनी सांगितले. केवळ महिन्याभरातच या मार्गाची वाताहात झाल्याची बाब परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनाला आली. या कामात गोलमाल तर झालेले नाही ना, अशा शंकाही ग्रामस्थांनी उपस्थित केल्या.

रेनकोट वाटप

दापोली : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यातर्फे दापोली पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरमेठ यांच्याकडे रेनकोट सुपूर्द करण्यात आले. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, नितीन साठे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डाॅक्टर व शेतकरी दिन

दापोली : दापोली लायन्स क्लबतर्फे जागतिक ‘डाॅक्टर्स डे’निमित्त डाॅक्टर्स, सी. ए. व शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते.

कृषीने साधला संवाद

मंडणगड : कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील आंबवली, साखरी, वेळास, बाणकोट, धामणी, गोठे, नारगोली गावातील शेतकऱ्यांना कृषीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी शास्त्रज्ञ डाॅ. विनय मोरे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

ऑनलाईन बैठक

मंडणगड : राष्टवादी काँग्रेसच्या दापोली, खेड व मंडणगड तालुक्यातील महिला व युवती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हा व वरिष्ठ स्तरावरील कार्यकर्त्यांनी नुकताच ऑनलाईन बैठकीव्दारे संवाद साधला. यावेळी कोमल चव्हाण यांची दापोली तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

कोविड सेंटरचे उद्घाटन

दापोली : दापोली तालुक्यातील गिम्हवणे ग्रामपंचायतीतर्फे ३० बेडच्या कोविड सेंटरचा शुभारंभ आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोविड सेंटरचे आज लोकार्पण

खेड : माजी आमदार संजय कदम यांच्या संकल्पनेतून चिंचघर - वेताळवाडी येथे १०० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खासदार सुनील तटकरे, शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम एस. एम. इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.

कडक लाॅकडाऊन

गणपतीपुळे : मालगुंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मालगुंडमध्ये प्रत्येक वाडीमध्ये जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून, बाहेरुन येणाऱ्या सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आला आहे.