शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी ५८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील बाधित रूग्णांची संख्या १ हजार ८८५ इतकी ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी ५८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील बाधित रूग्णांची संख्या १ हजार ८८५ इतकी झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा जणू स्फोट झाला आहे. दिवसागणिक बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. एकाच गावातून ५०हून अधिक बाधित रूग्ण सापडत आहेत. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे आरोग्य विभागाकडून स्वॅब नमुने घेण्यात येतात. मंगळवारी ५८ नवे रूग्ण सापडले आहेत.

हे रूग्ण देवरूख ग्रामीण रूग्णालय, संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय, वांद्री, माखजन, धामापूर, बुरंबी, निवे, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नव्याने रूग्णांची भर पडल्याने कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ हजार ८८५च्या घरात पोहोचली आहे. सध्या ५१० अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून, ७६ जणांवर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात ३३४ रूग्ण गृह अलगीकरणात असून, आजपर्यंत ५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.