शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

अजूनही बेदखलच : राज्य पातळीवरील आंदोलनाची रत्नागिरीतही नांदी, थकित मानधनासाठी नव्याने लढा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे राज्यभर उपोषणास प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील संगणक परिचालक उपोषणास बसले आहेत.नोव्हेंबरपासून संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले होते. डिसेंबरमध्ये संगणक परिचालकांनी उपोषण केले होते. याचा राग ठेवत महाआॅनलाईन कंपनीने राज्यातील चार हजार संगणक परिचालकांचे सेवा करार रद्द केले होते. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासमवेत संगणक परिचालकांची सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले होते. संप काळातील सेवा करार रद्द करण्यात आलेल्या सर्व संगणक परिचालकांना पुन्हा संधी देण्यात येईल तसेच संप काळातील अपूर्ण काम पूर्ण केल्यानंतर संप काळातील मानधन तसेच मागील महिन्यांचे थकित मानधन अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गिरीराज यांनी महाआॅनलाईन कंपनीला दि. ९ जानेवारी २०१५ रोजी लेखी पत्रान्वये सूचना करूनसुध्दा अद्याप सेवा करार पुनस्थापीत केलेले नाहीत. शिवाय केलेल्या कामाचा मोबदलाही अदा केलेला नाही. याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेने ४ फेब्रुवारी २०१५ च्या पत्राद्वारे संबंधित बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र तरीही महाआॅनलाईन कंपनीने त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.शिवाय शासनदेखील कंपनीला पाठीशी घालत संगणक परिचालकांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरिता पुन्हा एकदा काम बंद आंदोलन व बेमुदत उपोषणाचा निर्णय संघटनेने घेतला असून जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत.आजपर्यंत केलेल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय डाटा एन्ट्री आॅपरेटर्सच्या संघटनेने राज्यस्तरावर घेतला आहे.(प्रतिनिधी)आज होणार पुन्हा चर्चा...डाटाएंट्री आॅपरेटर्सनी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप यांच्याशी सायंकाळी उशिरा चर्चा केली. या बैठकीनंतर डाटाएंट्री आॅपरेटर्सनी उपोषण पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, उद्या मंगळवारी जिल्हा परिषदेसह कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच उपोषण सुरु ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ठेकेदार कंपनीकडून वारंवार फसवणूक होत असल्याची तक्रार.वारंवार आंदोलने करूनही शासन केवळ आश्वासने देत असल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुररू करण्याचा निर्णय.कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नसल्याने आॅपरेटर्समध्ये नाराजी.संप काळातील अपूर्ण काम जादा सेवा पूर्ण करून केल्यानंतर त्याचे जादा मानधन न दिल्याने आॅपरेटर्स संतप्त.