शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे.

असगोली : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ उपक्रमांतर्गत आरजीपीपीएल येथील सीआयएसएफच्या जवानांनी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंजनवेल नं. २ कातळवाडी येथे जाऊन परिसर स्वच्छ करुन एक नवा आदर्श घालून दिला.शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रभावी जाणीव व्हावी, त्यातून घर, शाळा परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशा पद्धतीने देश स्वच्छतेतून समृद्ध बनावा. याकामी प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे. आरजीपीपीएल, सीआयएसएफ युनिटचे उपकमांडंट महेश पोडवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक कमांडंट सुनील गोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांच्या पथकाने अंजनवेल नं. २ शाळेचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: बनवलेल्या पाना-फुलांच्या पुष्पगुच्छांनी जवानांचे स्वागत करुन भारतीयांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छताविषयक जाणीव जागृती व महत्व पटवून देण्यात आले.या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, उपशिक्षिका सुलक्षणा करडे - राशिनकर, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सहाय्यक कमांडंट गोयर यांनी सांगितले. त्यावेळी सीआयएसएफचे निरीक्षक राजीव शर्मा, रामनारायण प्रसाद गुप्ता, राकेश राजवाल व अन्य सीआयएसएफ आरजीपीपीएल युनिटचे अधिकारी व जवान उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अंजनवेल - कातळवाडी शाळेत राबविण्यात आलेल्या जवानांच्या उपक्रमाबद्दल त्या परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)