शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण नगरपरिषद कर्मचारी संपावर

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

कर्मचारी संघटना आक्रमक

चिपळूण : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेने आज (मंगळवार) राज्यात सर्वत्र पुकारलेल्या संपामध्ये चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.दि. १ जुलै रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नगरपरिषद कामगार संघटनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. राज्य शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. या संपामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेतील कर्मचारीही सहभागी होणार होते. ऐनवेळी त्यांनी या संपातून माघार घेतली असून, चिपळूणसह खेड नगर परिषद कर्मचारी संघटना संपात सहभागी झाली आहे.दरम्यान, सकाळी ११ वाजता माजी आमदार रमेश कदम यांनी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे, आरोग्य निरीक्षक अशोक साठे, नगरसेवक राजेश कदम, बांधकाम सभापती बरकत वांगडे, राजू खातू आदींसह अन्य विविध विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माजी आमदार कदम यांनी संघटनेची भूमिका प्रथम ऐकून घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आपण योग्य तो विचार करावा, अशी सूचना केली. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत येत्या दोन दिवसांत मंत्रालय स्तरावर विविध संघटनांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांसमवेत बैठकीस बसण्यास येथील संघटनेने संमती दर्शविली असून, राज्यस्तरीय पातळीवर हा संप असल्याने अन्य संघटनांना विश्वासात घेऊन याबाबत पुढील भूमिका ठरविली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे यांनी स्पष्ट केले.राज्यातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे १०० टक्के वेतन देण्यात यावे, हंगामी, ठेकेदारी, रोजंदारी व मानधनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे, अनुकंपावरील कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्ती द्यावी, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून मिळावीत, सुट्यांचा मोबदलाही मिळावा, मुख्याधिकारी पदावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी आदी विविध १९ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. (वार्ताहर)