शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ३५ गावचे पाणी दूषित

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

अडरे आरोग्य केंद्राअंतर्गत येथील ४ पाणी नमुने दूषित आहेत, यामध्ये अनारी बौद्धवाडी, खेर्डी देऊळवाडी, शिगवणवाडी व बौद्धवाडी.

अडरे : तालुक्यातील कामथे प्रयोग शाळेत तपासलेल्या ४१३ पाणी नमुन्यांपैकी फक्त ३५ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाकडून महिन्याला आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासले जातात. फेब्रुवारीत ४१३ नमुने घेऊन कामथे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ३५ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अडरे आरोग्य केंद्राअंतर्गत येथील ४ पाणी नमुने दूषित आहेत, यामध्ये अनारी बौद्धवाडी, खेर्डी देऊळवाडी, शिगवणवाडी व बौद्धवाडी. दादर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत, यामध्ये पेढांबे उगवतवाडी, कादवड बौद्धवाडी, ओवळी गावठण, नांदिवसे गावठण, शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पोफळीनाका. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ७ नमुने दूषित आहेत, यामध्ये दहिवली बुद्रुक बौद्धवाडी, कोंढे करंजकरवाडी, बौद्धवाडी, रेहेळेगाव, रेहेळेवाडी, रेहेळे कान्हेरेवाडी, वैजी फणसाचीचाळ. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ७ नमुने दूषित, यामध्ये ढाकमोली पाष्टेवाडी, मुर्तवडे देववाडी, धनगरवाडी, देववाडी, मधलीवाडी, कुटलवाडी, ढाकमोली पाटवाडी. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३ नमूने दूषित आहेत, यामध्ये रामपूर जोधगाव बौद्धवाडी, जोधगाव बौद्धवाडी, तळेचीवाडी. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५ नमुने दूषित आहेत, तळवडे गुरववाडी, बौद्धवाडी, दुर्गेवाडी, कोसबी गोताडवाडी, नांदगाव ढमालवाडी, दुर्गेवाडी कुंभार्ली. कापरे आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत. गोंधळे देऊळवाडी, करंबेळे, मजरेकोंढर नवरतवाडी, हनुमान गाव भोसलेवाडी. सावर्डे आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत, कामथेखुर्द हरेकरवाडी, कदमवाडी, आगवे गुरववाडी, आगवे बौद्धवाडीचा समावेश आहे. (वार्ताहर)