शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पंख छाटलेल्या ‘कोकणसुंदरी‘चे कॅटवॉक

By admin | Updated: March 14, 2016 00:23 IST

कोकण सुंदरी यंदा कॅटवाक करणार काय याकडे लक्ष आहे.

रत्नागिरी : आठ वर्षांपासून रत्नागिरीत होणारी कोकण सुंदरी स्पर्धा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेवर आर्थिक भार असलेल्या या स्पर्धेसाठी यावेळी संस्कृती ग्रुपतर्फे मागणी करण्यात आलेले ७ लाख ९० हजारांचे अनुदान १० मार्चच्या सभेत नामंजूर करण्यात आले. त्यामुळे ‘कोकण सुंदरी स्पर्धे’चे आर्थिक पंखच कापले गेले आहेत. त्यामुळे कोकण सुंदरी यंदा कॅटवाक करणार काय याकडे लक्ष आहे. कोकण सुंदरी स्पर्धेला यावेळी ७.९० लाखांचे अनुदान पालिकेने द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव ही स्पर्धा घेणाऱ्या संस्कृती गु्रुपने पालिकेकडे ठेवला होता. हा प्रस्ताव चर्चेला येताच नगराध्यक्षपद भाजपकडे असले तरी सभागृहातील बहुमत असलेल्या सेनेच्या सदस्यांनी अनुदान देण्यास विरोध केला. सेनेचे नगरसेवक मिलिंद कीर, पक्षप्रतोद बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे तसेच सेनेचे अन्य नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश शेट्ये यांनी या स्पर्धेचे समर्थन करीत अनुदान याआधीही दिले आहे, आता द्यायला काय हरकरत आहे, असे सांगितले. मात्र, सेनेच्या सदस्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत शहरात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आधी त्या कामांसाठी निधी वापरूया, असे सांगत हा प्रस्ताव धुडकावून लावला. भाजपच्या दीपा आगाशे यांनीही चर्चेत सहभागी होताना नगरपरिषद क्षेत्र रत्नागिरी शहरापुरते आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांची उधळण शहराबाहेर व्याप्ती असणाऱ्या कार्यक्रमासाठी कशासाठी? असा सवाल केला. अनुदान दिलेले नसले तरी ही स्पर्धा होणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)