शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दाखलेप्रकरणी दोघांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: December 7, 2015 00:18 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

रहिम दलाल-- रत्नागिरी--आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांची वेतनवाढ रोखली, तर अन्य पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. खोट्या पदवीप्रकरणानंतर थंड होऊ लागलेल्या जिल्हा परिषदेत आता आंतरजिल्हा बदलीसाठी खोट्या दाखल्यांचे प्रकरण गाजू लागले आहे. हा प्रश्न सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले होते. त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सात शिक्षक असल्याचे पुढे आले होते. त्यामध्ये शिक्षक - शिवाजी कोयनाप्पा करवर, चंद्रकांत दत्तात्रय कोरबू, रेवाप्पा सर्जेराव खोत, शिक्षिका - कविता दत्तात्रय आंबी, सुशिला सुर्याबा सलगर, आरती वसंत चव्हाण व आशाताई तानाजी मंडळे यांचा समावेश आहे.खोटे दाखले जोडून या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचा उघडकीस आला. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी दखल घेतली होती. त्यानंतर त्या शिक्षकांवर त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याबाबत त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे त्या सातही शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यांची खातेनिहाय चौकशी करुन मूळ कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या झालेल्या चौकशीमध्ये शिक्षिका कविता आंबी आणि आशाताई मदने यांनी खोटी कागदपत्र जोडल्याचा गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी या दोघांंचीही वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.तसेच शिवाजी करवर, चंद्रकांत कोरबू, सुशिला सरगर, आरती चव्हाण आणि रेवाप्पा खोत या शिक्षकांनी हात वर करीत जोडलेले कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगून गुन्हा नाकबूल केला. त्यामुळे जिल्हा परिषदेने या पाचही जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.मुलांना काय धडे देणार? : खोटे बोलण्यात गुरुजींचा कहरआंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडल्याचे प्रकरण सांगली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. नातेवाईक शासकीय सेवेत नसतानाही त्यांनी ते सेवेत असल्याचे दाखले जोडल्याचे नाकारून गुरुजींनी खोटे बोलण्याचा कहरच केला आहे. त्यामुळे असे सत्य बोलण्याचे मुलांना काय धडे देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.फौजदारी अद्याप नाहीमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण विभाग त्यांची मूळ कागदपत्र पोलिसांसमोर सादर करूशकलेला नाही. त्यामुळे त्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई अद्याप झालेली नाही.