शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीकडे उमेदवारांची वानवा

By admin | Updated: October 26, 2016 23:35 IST

खेड नगर पालिका : अद्याप एकमत नसल्याने तिढा कायम!

खेड : खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी काहीशी चुरस निर्माण झाली आहे. दोन दिवस झाले तरी एकाही इच्छुकाने अद्याप आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. आमदार संजय कदम यांच्या तथाकथित शहर विकास आघाडीमध्येदेखील अद्याप शांतताच आहे. कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमत होऊ न शकल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आघाडीकडे सध्या उमेदवारांची वानवा असून, मनसे व राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आघाडीची हवा निघून गेली आहे. शिवसेनेने मात्र ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. खेड नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान एरव्ही शिवसेना आणि काँग्रेस अशी सरळ लढत होत असे. गेल्या १० वर्षांमध्ये शिवसेना विरूध्द मनसे आणि राष्ट्रवादी अशा सरळ लढती झाल्या. आता प्रथमच २०१६मध्ये ही निवडणूक थेट शहर विकास आघाडीसह मनसे विरूध्द शिवसेना अशी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नामोनिशाण नसले तरी राष्ट्रवादी पुरस्कृत ही आघाडी असल्याने आणि या आघाडीने मनसेशी युती करण्याच्या शक्यतेने शिवसेना विरूध्द आघाडी अशी लढत होत आहे. वस्तुत: खेड शहरामधील विकासामध्ये शिवसेनेची अनेक वर्षाची नाळ जोडली आहे. शहराचा विकास कसा असतो, हे शिवसेनेने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. याच कार्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनीही रामदास कदमांवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत शहरवासीय शिवसेनेच्या पाठीशी राहणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेने आपल्या कार्यकालामध्ये काही रस्ते, पथदिवे आणि गटारांची काही कामे वगळता शहर विकासाच्या कार्यामध्ये फोर मोठे योगदान दिले नाही. कचरा डेपो ते ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य, असा त्यांच्या कामाचा क्रम राहिल्याने स्वच्छ शहर व सुंदर शहराची कल्पना आजही अधांतरीच राहिली आहे. स्मरणात राहील, असे काम मनसेने ४ वर्षांत केलेले नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर आणि तेही शासकीय योजनेचा निधी शिल्लक राहील, या भीतीने आणि या निधीचा विनियोग सत्तेत येणारा पक्ष आपल्या कामासाठी करणार असल्याच्या भावनेतून मनसेच्या सत्ताधाऱ्यांनी अखेरच्या एका वर्षात उर्वरित कामांना मंजुरी दिली. या कामांचे भूमिपूजनही उरकून टाकले. मनसेने काही सामाजिक उपक्रम राबविले असले तरीही याअगोदरच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेली विकासकामे तुलनेने जास्त आहेत. तुलनात्मकदृष्ट्या शिवसेनेचे कार्य सरस ठरले आहे, अशा स्थितीत मनसेने चक्क राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीसोबत घरोबा करण्याचे ठरविल्याने आणि त्यादृष्टीने मनसेच्या वैभव खेडेकर यांनीही धोरणे आखायला सुरूवात केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. वैभव खेडेकर यांनी या आघाडीमध्ये जायला नको होते, अशी चर्चा खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही सुरू आहे. कार्यकर्त्यांशी याअगोदर याबाबत बोलणी करणे आवश्यक होती, असा सूरदेखील हे कार्यकर्ते आळवत आहेत. मात्र, याची दखल खेडेकर यांनी घेतली नसल्याचे शल्य अनेक कार्यकर्त्यांना आहे़ मनसेअंतर्गत ही द्विधा स्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीमध्येदेखील काही आलबेल नाही, तर काँग्रेसवासीय आजघडीला राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी काँग्रेसचे आसीफ खोत, मनसेचे शहर अध्यक्ष भूषण चिखले यांचे बंधू अभिजित चिखले, मनसेचे माजी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते यांनी रामदास कदमांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेसह या आघाडीलाच मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसात मनसेचे आणखी काही नगरसेवक आणि माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, मनसेसह शहर विकास आघाडी खिळखिळी होणार आहे. आघाडी होण्याआधीच बिघाडी होणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)