शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तुळसवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यातील तुळसवडे येथील एका गोठ्यात घुसून बिबट्याने एक वर्षाच्या वासराला ठार मारल्याची घटना रविवारी रात्री घडली़ ...

राजापूर : तालुक्यातील तुळसवडे येथील एका गोठ्यात घुसून बिबट्याने एक वर्षाच्या वासराला ठार मारल्याची घटना रविवारी रात्री घडली़ त्या घटनेनंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

तुळसवडे येथील माजी उपसरपंच प्रकाश सदाशिव गराटे यांच्या घराजवळ त्यांचा गोठा आहे़ त्यामध्ये तीन जनावरे होती़ रविवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान एक बिबट्या गराटे यांच्या बंदिस्त गोठ्यात शिरला व त्याने गोठ्यात बांधलेल्या एक वर्षाच्या वासरावर हल्ला केला़ दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यानंतर गोठ्यातील अन्य दोन जनावरांची सुरू असलेली धडपड गराटे यांच्या पत्नीच्या लक्षात आली़ त्यानंतर प्रकाश गराटे व घरातील अन्य मंडळींनी गोठ्यात जाऊन पाहणी केली असता त्यांचे एक वर्षाचे वासरू जखमी अवस्थेत आढळले़ तत्पूर्वी बिबट्या गोठ्यातून पसार झाला होता़ काही वेळात जखमी वासरू मृत झाले़ दरम्यान, तुळसवडे गावचे उपसरपंच संजय कपाळे यांनी राजापूर वनविभागाला झालेल्या घटनेची माहिती दिली़ बिबट्याने गोठ्यात घुसून केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाल्याच्या घटनेने तुळसवडे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे़ मुक्त फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी करण्यात येत आहे़