शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: March 3, 2015 00:26 IST

चिपळूण एस. टी. आगार : प्रवाशांची गैरसोय झाली दूर--लोकमतचा प्रभाव

चिपळूण : शहरातील जुन्या बसस्थानक आवारात खासगी गाड्या उभ्या राहात असल्याने मुख्य बससथानकातून सुटणाऱ्या एस. टी. बस स्थानकात आणण्यास चालकांना त्रासदायक ठरत होते. ही बाब ‘लोकमत’ने संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेऊन या स्थानकात आज (सोमवार)पासून बी. के. भिंगारे यांची वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी गाड्या उभ्या करण्यास निर्बंध करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईनजीक हे जुने बसस्थानक आहे. मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या व गुहागर मार्गावर जाणाऱ्या एस. टी. बसेस या स्थानकात आल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असतात. मात्र, हे बसस्थानक खासगी गाड्यांचे वाहनतळ बनले आहे की काय, असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध आले. याची दखल घेऊन आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांनी या आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून भिंगारे यांची नियुक्ती केली आहे. गुहागर मार्गावर जाणाऱ्या सर्व एस. टी. गाड्यांची नोंद येथे केली जाते. हे बससथानक असूनही येथे खासगी गाड्या तासन्तास उभ्या राहतात. त्यामुळे बसस्थानकात एस. टी. आणण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातून बस वळवली जात असे. त्यामुळे स्थानकात असणाऱ्या प्रवाशांची एस. टी. बस पकडण्यासाठी धावपळ होत असे. काही प्रवासी शेजारी असणाऱ्या दुकानासमोरच उभे राहात असत. याची दखल घेऊन बसस्थानकात वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात आला असल्याने उभ्या राहणाऱ्या खासगी गाड्यांना आता चाप बसला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)