शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांनो... जागते रहो...!

By admin | Updated: April 24, 2016 00:35 IST

पहारा कडक : कॅनिंग सुरु झाल्याने वाढली चोरीची भीती

रत्नागिरी : आंबा कमी असतानासुध्दा कॅनिंग सुरू झाल्याने शेतकरीबांधव चिंताग्रस्त झाला आहे. कॅनिंग सुरू झाल्यानंतर चोरीचे प्रकार वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील पहारा कडक केला आहे.यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्याने हंगामापूर्वी आलेला मोहोर टिकला. शेतकऱ्यांना १५ ते १६ वेळा फवारण्या कराव्या लागल्या. प्रतिबंधात्मक कीटकनाशकांमुळे तुडतुडा नष्ट होत नाही. तुडतुड्याच्या विष्ठेमुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत. डाग पडलेल्या आंब्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे निवडक आंब्याच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा किलोवर दिल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या रोखीने पैसे मिळतात.ग्रामीण भागाबरोबर शहरातही कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ एप्रिलपासून कँनिग सुरू झाले आहे. ३० रुपये किलो दराने या आंब्याची खरेदी सुरू आहे. आंबा कमी असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्याने चोरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या बागेत जागता पहारा करत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या बागा भाडेकराराने घेऊन आंबा व्यवसाय करणारी मंडळी अधिक आहेत. प्रामुख्याने कलमबाग मालकांसोबत दोन ते तीन वर्षांसाठी करार करण्यात येतो. त्यामुळे ठरलेले पैसे मालक घेतो. याच दरम्यान झालेल्या नुकसानासाठी शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईदेखील शेतकरीच घेतो. मात्र, करार करणारा व्यापारी पीक मिळेपर्यंत खते, कीटकनाशके, मजुरी, काढणी, लाकडी पिंजरा, वाहतूक, हमाली, दलाली मिळून मार्केटला पाठवेपर्यंत प्रचंड खर्च करतो. मार्केटमधील दर स्थिर असला तर खर्च निघतो. मात्र, नैसर्गिक दुष्टचक्राचा फटका पिकाला बसत असल्याने व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. यावर्षी आंबापीक मुळातच कमी आहे. तसेच मार्केटमध्ये अद्याप आंबा मुबलक स्वरूपात जाण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)मागणी.. : रात्री अपरात्रीचा आंबा घेऊच नयेकॅनिंग व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चोरी वाढत असल्यामुळे कलमबागांचे मालक किंवा कराराने बागा घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडूनच आंबा कॅनिंग विके्रत्यांनी विकत घ्यावा. चोरीचा किंवा रात्री-अपरात्री आंबा विक्रीस आणणाऱ्यांचा आंबा विकत घेऊ नये, जेणेकरून या चोरीला आळा बसेल. वास्तविक आंबापीक येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे या व्यवसायावर कोठेतरी नियंत्रण येणे गरजेचे आहे.-एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी.