शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

लाकूडतोड्यांना दणका

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

बी. आर. पाटील : अवैध तोड करणाऱ्यांना दंड

चिपळूण : चिपळूण व गुहागर तालुक्यात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत ९३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५९ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी महिती परिक्षेत्र वन अधिकारी बा. रा. पाटील यांनी दिली.वन खात्याने आतापर्यंत शशिकांत महिपतराव शिंदे (गणेशपूर), विनोद वसंतराव शिंदे (तिवरे), जितेंद्र शांताराम शिंदे (ओवळी), सुनील मोरे व प्रमोद मोरे (आकले) यांच्यावर कारवाई केली आहे. चिपळूण परिमंडल क्षेत्रात दंडाची एकूण २७ प्रकरणे झाली आहेत. त्यातील ७५ जणांकडून ४६ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सावर्डे परिमंडल क्षेत्रात ४ दंडाची प्रकरणे करताना १० जणांकडून ७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. गुहागर येथील ३ जणांवर दंड करताना ८ जणांकडून ६ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला. वर्षभरात १९ हजार ६९४ झाडांची तोड झाली आहे.ज्या शेतकऱ्यांना वन विभागाने वृक्षतोडीसाठी परवानगी दिली होती, त्या शेतकऱ्यांकडून दुप्पट वृक्ष लागवड करुन घेण्यात येणार आहे. वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत . त्यासाठी पिंपळी येथील वन विभागाच्या नर्सरीमध्ये पिंपळ, शिवण, आवळा, गुलमोहर, साग आदींच्या ५० हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. वृक्षतोडीसाठी परवानगी दिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून नवीन लागवडीसाठी शासकीय नियमानुसार काही रक्कमही घेण्यात आली आहे. त्यातून नवीन रोपांची निर्मिती करण्यात आली असून, काही दिवसात लागवड सुरु होईल, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)कारवाईची माहिती...चिपळूण व गुहागर तालुक्यात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून केलेल्या कारवाईची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. जेथे वृक्षतोड सुरू आहे तेथे कठोर उपाय योजण्यात येत असल्याची माहिती देतानाच वृक्ष लागवडीवर भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. ही कारवाई पुढे सुरू राहणार आहे.