शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खवटीत हायस्कूलची इमारत खचली

By admin | Updated: March 6, 2015 00:24 IST

४ लाखांचे नुकसान

खेड : तालुक्यातील खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या मालकीची हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत बुधवारी रात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने जीवितहानी झाली नाही. ही इमारत सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाच्या दणक्याने कोसळल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे़ मुंबई - गोवा महामार्गावरील गजबजलेल्या अशा भागात खवटी पंचकोशी शिक्षण संस्थेच्या मालकीची ही इमारत उभी आहे. १९९९मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. सध्या या इमारतीमध्ये इयत्ता दहावीचे दोन वर्ग आहेत. या दोन वर्गात एकूण १०२ विद्यार्थी आहेत. याच इमारतीमधील दहावी अ आणि (ब)चा वर्ग कोसळला आहे. ही घटना रात्रीची घडली असावी, असा तर्क ग्रामस्थांनी केला आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. खवटी प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग प्रशालेत सुरू आहेत. गुरुवारी सकाळी ७ वाजता हे वर्ग सुरू होतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे कशेडी येथील विद्यार्थी या जादा वर्गासाठी प्रशालेत ६.४५ वाजता आले होते. मात्र, यावेळी दहावीचे वर्ग कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संस्थेचे अध्यक्ष सुनील दळवी यांना दूरध्वनीद्वारे कळविले. दळवी यांनी यावेळी संस्थेचे सचिव कैलास यादव, खजिनदार संतोष ंिशंदे, सुभाष दळवी, चंद्रकांत दळवी, महादेव दळवी, लक्ष्मण दळवी, विलास दळवी, सुरेंद्र दरेकर यांच्यासह ग्रामस्थांना सोबत घेऊन दुर्घटनेची पाहणी केली. अवघ्या १५ वर्षांत ही इमारत कोसळली. याबाबत सर्वच जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. जमीन खचल्याने ही इमारत कोसळल्याचे दळवी यांनी सांगितले आहे. याबाबत आपण तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोणीही भेट दिली नाही. कदाचित ते शुक्रवारी भेट देण्याची शक्यता इळवी यांनी वर्तवली आहे़ या दुर्घटनेतील दहावीचे वर्ग कोसळल्याने या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था संकटात सापडली आहे. परीक्षा काळामध्ये या विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यासाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)