शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
2
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
3
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
4
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
5
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
6
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
7
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
8
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
9
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
10
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
11
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
12
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
13
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
14
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
15
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
16
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
17
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
18
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
19
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
20
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी

वाहनाच्या गतीला वेगनियंत्रकाचा ‘ब्रेक’

By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST

नवा वाहन नियम : प्रती तास ८० किलोमीटर वेग निर्धारित

रत्नागिरी : मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४)नुसार केंद्र शासनाकडून १ आॅक्टोबर २०१५ वा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत.केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ११८मध्ये सुधारणा करुन नवीन नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या नियमानुसार मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४) नुसार कें द्र शासनाने अधिसूचित केलेल्या आणि १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार अकर 018 : 2012 च्या मानकाची पूर्तता करणारा जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे आवश्यक आहे. १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणारी वाहने डंपर्स, ट्रक, स्कूल बसेस, धोकादायक मालांची वाहतूक करणारी वाहने किंवा केंद्रशासन राजपत्रातील अधिसूचनेनुसार निर्देशित केलेली इतर कोणत्याही संवर्गातील वाहने यांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेग नियंत्रक बसविणे आवश्यक आहे. अकर 018 : 2012 च्या मानकास अनुसरुन जास्तीतजास्त ६० किलोमीटर प्रती तास वेग नियंत्रित केलेला असणे आवश्यक आहे. मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत. यात दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, क्वाड्री सायकल, प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेली चारचाकी वाहने, ज्यांची आसनक्षमता चालकास धरुन ८पेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन ३५ किलोग्रॅमपेक्षा जास्त नसेल अशी वाहने, अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने, नियम १२६ मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यापित व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग ८० किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक नाही अशी वाहने यांचा समावेश आहे. यामुळे काही अंशी वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)