शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मार्गताम्हाणे येथे तरुणाचा खून?

By admin | Updated: May 11, 2017 23:01 IST

मार्गताम्हाणे येथे तरुणाचा खून?

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावर मार्गताम्हाणे पॉवर हाऊसजवळ जंगलमय भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह परप्रांतीय तरुणाचा असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मार्गताम्हाणे बोऱ्या फाट्याच्या पुढील भागात असलेल्या पॉवर हाऊसजवळ निर्जनस्थळी खोरा येथे कुंभ्याच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. मृतदेहाच्या अंगावर हिरवट टी-शर्ट व निळी जिन्स पँट व पायात स्पोर्टस् शूज होते. चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक बडेसाहब नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, रामपूर दूरक्षेत्राचे हवालदार उदय भोसले, तडवी, लालजी यादव इतर पुरुष कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतदेहाची पाहणी केली.मृतदेहाजवळ एक बंद मोबाईल होता. त्याचे हात झाडाला बांधलेले होते व त्याच्या तोंडाला कापड बांधलेले होते. हा तरुण २५ ते ३० वर्षांचा असावा. त्याचा खून करून त्याला तेथे लटकविण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चिपळूणच्या उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृत तरुणाचा बंद मोबाईल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील असावा, असे समजल्याने पोलिसांनी ती शक्यता पडताळून पाहिली; परंतु संबंधित लोकांनी हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे सांगितले. त्यामुळे अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. रात्री उशिरा चिपळूण पोलीस ठाण्यात या खुनाची नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.