शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

छावा प्रतिष्ठानतर्फे नारशिंगे येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील छावा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नारशिंगे ...

रत्नागिरी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील छावा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नारशिंगे येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.

या वेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. एस. गावंडे, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, जयश्री कुंडलकर, डॉ. श्रद्धा मॅथ्यू, कृष्णा मकवाना, संदीप वाडेकर तसेच ग्रामीण पोलीस ठाणेचे कॉन्स्टेबल किशाेर जोशी, ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्राम पानगले, सुहानी कुळये (सरपंच), महेश देसाई (उपसरपंच), अजंली आग्रे (सदस्या) अनंत कुळये (तलाठी), प्रवीण कांबळे (पोलीस पाटील), डॉ. वर्षा वाणी, डॉ. शिवानंद वाणी, शांताराम पानगले, प्रकाश रोडे, अनंत धावडे, प्रकाश धावडे, अमोल कांबळे, विलास मालप, हिंदू राष्ट्र सेनेचे सदस्य प्रवीण रोडे, प्रथमेश कांबळे, विशाल कांबळे, विलास कांबळे, आदी उपस्थित होते.

छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील धावडे, उपाध्यक्ष सुनील आग्रे, समीर धावडे, समीर गोताड, संतोष आग्रे, गणेश कांबळे, संगम धावडे, नंदकुमार धावडे, मोहन पवार, प्रवीण धावडे, चंद्रकांत गोताड यांनी स्वागत केले. या वेळी छावा प्रतिष्ठानचे सदस्य रितेश धावडे, राहुल धावडे सचिन धावडे, विजय धावडे, सुदीप पवार, नीलेश कळंबटे, अमित रोडे, प्रशांत कांबळे, सूर्यकांत गोताड उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली. बोंडये व आगवे गावातील तरुणांचे विशेष सहकार्य लाभले. छावा प्रतिष्ठान कडून कोरोना काळातील ६ वे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीकडून धन्यवाद देण्यात आले.

फोटो मजकूर...

नारशिंगे (ता. रत्नागिरी) येथे छावा प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात सहभागी झालेल्या दात्यांना प्रतिष्ठानतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.