शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या धडकेत सख्खे चुलतभाऊ ठार

By admin | Updated: April 24, 2016 00:48 IST

एक गंभीर : संगमेश्वर येथे अपघात

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका मोटारसायकलवरील दोघेजण जागीच ठार झाले. तर सहावर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी संगमेश्वर रेल्वेस्थानकासमोर घडली. मृतांमध्ये आंबेड खुर्द तांबेवाडी येथील प्रतीक प्रकाश विंजळे (वय १७) व मोटारसायकलस्वार शैलेश विजय विंजळे (२८) या दोन सख्ख्या चुलतभावांचा समावेश आहे. त्यांचा आतेभाऊ निखिल रूपेश तांबे (६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारांकरिता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेड खुर्द तांबेवाडी येथे शनिवारी विवाह सोहळा होता. विवाह झाल्यानंतर थंड पेय आणण्यासाठी म्हणून दुपारी अडीच वाजता शैलेश मोटारसायकल (एमएच ०८ क््यू ७९८७) घेऊन धामणीच्या दिशेने निघाला. त्याच्यासोबत प्रतीक व निखिल हेही होते. संगमेश्वर रेल्वेस्थानकासमोर महामार्गावर गोव्याच्या दिशेने वेगाने येणाऱ्या दुसऱ्या एका मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती क ी, तिघेही महामार्गावर कोेसळले. तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात शैलेश व प्रतीक जागीच गतप्राण झाले.अपघात घडल्यानंतर वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने आपली अपघातग्रस्त मोटारसायकल नजीकच्या पेट्रोलपंपाजवळ उभी करून दुसऱ्या मोटारसायकलने पलायन केले. या मोटारसायकलस्वाराचा शोध पोलिस घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोहर चिखले, वाहतूक पोलिस बाबा कदम, हेडकॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृत दोघांचा मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे विंजळे कुटुंबातील विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. तांबेवाडीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)नेत्यांनी नेले जखमीला रुग्णालयातसहा वर्षीय निखिल यात गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडला त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राके श जाधव हे महामार्गावरून जात होते. त्यांनी निखिलला आपल्या वाहनात घेऊन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.