शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) पासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

कारणे : १़ मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे (केमिकल लोचा). यामध्ये मुख्यत: डोपामिन नावच्या केमिकलचे प्रमाण किंवा परिणाम वाढतो. ...

कारणे : १़ मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे (केमिकल लोचा). यामध्ये मुख्यत: डोपामिन नावच्या केमिकलचे प्रमाण किंवा परिणाम वाढतो.

२. आनुवंशिकता: अनेक रुग्णामध्ये आनुवंशिकपणे झालेला आढळतो. आईवडील किंवा जवळच्या नातेवाइकांना आजार असल्यास, हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

३. बालपण/बाल अवस्थेत होणारा मानसिक आघात बालपण कसे होते, कडक शिस्तीचे पालक, पालकातील भांडणे, एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट अशा परिस्थितील बालपण असेल तर. लैंगिक शोषण किंवा मानसिक छळ झाला असेल तर.

४. मानसिक ताण तणाव, सामाजिक किंवा आर्थिक किंवा कुठल्याही कारणामुळे होणारा ताणतणावामुळे किंवा एखादी खूप आनंदाची घटना घडल्यासही ते काही जणांना सहन न झाल्यामुळे असा आजार होऊ शकतो.

स्किझोफ्रेनियाचे विविध प्रकार व त्याची लक्षणे

प्रकार १- पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता)

१. कानात आवाजाचे भास होणे - कोणीतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्दल बोलत आहे, असे वाटणे.

बहुधा ते वाईटच बोलतात किंवा आपल्याला शिवीगाळ करतात, असे आवाज असतात. त्यामुळे रुग्ण चिडचिडपणा करतो किंवा आक्रमक होतो. काही वेळा हे आवाज त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी सांगतात. त्यामुळे रुग्ण त्या पद्धतीने वागतात जसे की, तोडफोड करणे, एखाद्याला मारणे. काही वेळा

हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात व त्या भरात रुग्ण आत्महत्या करतो.

२. मनात संशय येणे - कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना मारेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्दल बोलतात असे वाटणे. माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्यामागे पोलीस लावलेले आहेत, कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू

केली आहे, मूठमाती केली आहे, असा संशय येतो किंवा काही वेळा आपल्या पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत, असे संशय घेतो.

प्रकार २ - डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता)

१) असंबद्ध बडबड करणे. रुग्ण काहीही बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता, दुसरेच काहीतरी उत्तर देतो किंवा सर्व प्रश्नाला तेच तेच उत्तर देतो. एकच शब्द / वाक्य सारखा सारखा बोलतो. आपण जे विचारतो तेच तेच वाक्य परत बोलतो. नवीन नवीन शब्द बोलतो किंवा वेगळ्या भाषेत बोलल्यासारखे बोलतो.

२) असंबंध वागणे / विचित्र वागणे : रुग्ण स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ करत नाहीत, कपडे बदलत नाहीत, दाढी किंवा केस कापत नाहीत. कचरा गोळा करतात. कपडे घालत नाहीत, काढून टाकतात. लोकांत कसे बोलावे, कसे वागावे, हे त्यांना कळत नाही. एकटे असताना किंवा स्वत:शी

बडबड करतात, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहतात. (रस्त्यावरती अशा अवस्थेत फिरणारे बरेचशे लोक गरीब किंवा भिकारी नसून ते या आजाराचे रुग्ण असतात.)

प्रकार ३- कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया (गलितगात्र छिन्नमनस्कता)

१. शारीरिक हालचाल खूप कमी होते किंवा खूप प्रमाणात वाढते. ज्यावेळी हालचाल कमी होते, त्यावेळी रुग्ण स्तब्ध बसून राहतो, काही हालचाल करत नाही. एखाद्या स्थितीत बराच वेळ बसून राहतो किंवा पुतळ्यासारखा थांबून राहतो. ज्यावेळी हालचाल वाढते, त्यावेळी विनाकारण इकडे तिकडे पळत राहतो किंवा कृती करत राहतो.

२. रुग्ण काहीच बोलत नाही. अगदीच शांत राहतो.

३. एकाच कृती वारंवार करतो. विशिष्ट लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण व सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो.

४. समोरचा जे बोलेल, तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल तीच कृती वारंवार करतो.

उपचार : १. औषधोपचार : विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक चांगली औषधे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर, वेळीच व सल्ल्याप्रमाणे उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा त्यांचा आजार पूर्णपणे काबूत राहू शकतो.

२. विद्युत लहरी उपचार (शॉक / ECT) : तीव्र प्रकारच्या आजारामध्ये जेव्हा पेशंट मारामारी करत असेल, स्वतःला किंवा दुसर्‍याला अपाय करत असेल, आत्महत्या करायचा प्रयत्न करत असेल किंवा औषधोपचाराने बरा होत नसल्यास विद्युत लहरी उपचार केला जातो. ही एक अतिशय सुरक्षित व प्रभावी उपचार पद्धती आहे.

३ . मानसोपचार / समुपदेशन : औषधोपचाराने रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्ण पूर्ववत होण्यासाठी मानसोपचार व समुपदेशन केले जाते. कुटुंबाचे समुपदेशन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते, तसेच रुग्ण पूर्ववत व्हावा व त्याने चांगले आयुष्य जगावे, म्हणून त्याचे व्यावसायिक पुनर्वसन करणे आवश्यक असते.

- डॉ.अतुल ढगे

मनोविकार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ व लैंगिकसमस्या तज्ज्ञ व सर्टिफाइड सायकोथेरपिस्ट व काउन्सलर. माइंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी