शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; जिल्हा प्रशासन झाले सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. सध्या जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ५.७ टक्क्यांवर आला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. सध्या जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ५.७ टक्क्यांवर आला आहे. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका समोर उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग अधिक सतर्क राहू लागला आहे. या लाटेचा बालकांना असलेला धोका लक्षात घेऊन स्वतंत्र बाल कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात सध्या काेरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असली तरीही जागतिक स्तरावर तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. या लाटेचा धोका बालकांना असल्याचे म्हटले जात आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी शहरात अद्ययावत बाल काेरोना सेंटर्स ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आदी दृष्टीने अद्ययावत तयार करण्यात आले आहेत.

बालके बाधित झाल्यास रत्नागिरी शहरात महिला रुग्णालयात २० बेडचा अतिदक्षता विभाग आणि १२ बेडचा आयसीयू कक्ष तयार ठेवण्यात आला आहे. या बालकांना आपण घरी उपचार घेत असल्याची भावना निर्माण व्हावी, यादृष्टीने या केअर सेंटरमध्ये खेळणीही उपलब्ध करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात ३२ सेंटर्स, १३ हजार ऑक्सिजन बेड्स तयार

जिल्ह्यात सध्या ६ जिल्हा कोरोना रुग्णालये, २५ कोरोना हेल्थ सेंटर आणि ३२ केअर सेंटर्स कार्यरत आहेत. यात सध्या साडेतेरा हजार ऑक्सिजन बेड्‌स तयार ठेवले असून यापैकी सध्या २,१७३ (१६ टक्के) बेड रिक्त आहेत. अजूनही बेड वाढविले जाणार आहेत.

लहान मुलांसाठी केअर सेंटर

रत्नागिरीत स्वस्तिक रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी अतिदक्षता विभाग तसेच स्वतंत्र ऑक्सिजन बेड कक्ष तयार करण्यात आला आहे. शिवाजी स्टेडिअम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय येथेही बाल कोरोना सेंटर उभारण्यात आले असून तालुक्यांमध्येही बाल कोविड सेंटर्स उभारण्यात येत आहेत.

ऑक्सिजन प्लांटची तयारी

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू झाला असून महिला रुग्णालयाचा प्लांटही येत्या दहा -पंधरा दिवसात सुरू होईल.

दापोली, कळंबणी आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच आणि ओणी ग्रामीण रुग्णालयात पी. एस. ए. प्लांटचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात शासकीय रुग्णालय आणि महिला रुग्णालयात मिळून सुमारे ५०० बेड तयार आहेत.

सध्या जिल्ह्यात ५८३ ऑक्सिजन बेड, १५०३ नाॅन ऑक्सिजन बेड आणि ८७ आयसीयू बेड रिक्त आहेत.

गरजेनुसार बेड वाढविण्यात येणार आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. पाॅझिटिव्हिटी रेट ५.७ टक्क्यांवर आला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची जिल्हा आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रत्नागिरी शहरात बाल कोरोना रुग्णालये आणि केअर सेंटर्स सुरू केली आहेत. प्रत्येक तालुक्यातही अशी सेंटर्स सुरू होणार आहेत. कोरोना कमी होत असला तरी नागरिकांनीही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी