शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कलाक्षेत्राला सरकारी नोकऱ्यांनीच कलाकार पुरवले

By admin | Updated: February 15, 2015 00:45 IST

मकरंद अनासपुरे : जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी रमले स्नेहसंमेलनात

रत्नागिरी : बहुतांश कलावंत हे सरकारी नोकरीमधून कलेच्या क्षेत्रात आले. ते फार मोठे झाले आहेत. प्रत्येक कलावंत हा स्नेहसंमेलनातून तयार होतो, असे मत आपले विचार मांडतांना मराठी चित्रपटातील अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यासपीठावरून कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे मनोरंजनही केले. जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, रत्नागिरीतर्फे आयोजित २०व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी अनासपुरे यांचा सपत्नीक जिल्हा परिषदेच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अनासपुरे उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आपला देश माणसांपेक्षा कागदांचाच जास्त आहे. कागदामध्ये सुजलाम्, सुफलाम् आहोत. आपण माणसांमध्ये सुजलाम्, सुफलाम् होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्येक कलावंत हा स्नेहसंमेलनातून तयार होतो. आपल्या स्नेहसंमेलनाला समय सुचकता दिली. संघर्षाच्या काळातील आठवणींना त्यांनी उजाला दिला. मतभेद असावेत. मनभेद असू नयेत. त्यासाठी प्रत्येकांने प्रत्येकाला प्रेमाने जिंकावे. संस्कृती व परंपरा जपलीच पाहिजेत. मात्र, संस्कृतीचा बरमोडा होता कामा नये. ते जपणे अवश्यक आहे. दोन ज्ञानी एकत्र आले तर संवाद होतो. ज्ञानी व अडाणी एकत्र आले, तर विसंवाद होतो आणि दोन अडाणी एकत्र आले तर वादवादी होते, असे सांगतानाच लॉजिकल विचार कमी होत चालला आहे. मात्र, लॉजिकल विचार स्नेहसंमेलनातून होणे अवश्यक असल्याचे, त्यांनी सांगितले. यावेळी अनासपुरे यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या, उपविजेत्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, उपाध्यक्ष सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण, सदस्य उदय बने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शिक्षण व अर्थ सभापती ऐश्वर्या घोसाळकर, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, कॅफो अविनाथ साळुंखे, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष वामन कदम व अन्य उपस्थित होते. (शहर वार्ताहर)