रत्नागिरी : वर्साेवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सहा महिन्यांचे प्रशिक्षण असून दि. १ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक लाभार्थींनी दि.२१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फेे करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे प्रशिक्षण देण्यात येते. वर्साेवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी २०२१-२२ या वर्षात दि. १ जुलै ते दि. ३१ डिसेंबरअखेर सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्साेवा, मुंबई-६१ येथे दि. २१ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे