शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी वैद्यकीय अधिकाऱ्याचा रुग्णालयात धिंगाणा

By admin | Updated: December 2, 2014 23:16 IST

कारवाईची मागणी

चिपळूण : आपली पत्नी आजारी आहे, तिच्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स द्या, अशी मागणी करत रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आज, मंगळवारी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत जोरदार धिंगाणा घातला. दुसऱ्या गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्याने जुमानले नाही. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे ३० ते ४० रुग्ण बसले होते. डॉक्टर येतील व आपल्याला तपासतील, या अपेक्षेत ते असताना मद्यधुंद अवस्थेत आपल्या केबिनमध्ये बसलेले वैद्यकीय अधिकारी शिवराज घोगरे यांनी आपली पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णवाहिका द्या, असे सांगत गोंधळ घातला. त्याने कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व अर्वाच्च शिवीगाळ केली. रुग्णालयातील हा गोंधळ ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रवक्ते राजेश जाधव यांनी डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंच महेश कातकर हेही घटनास्थळी आले.हा विषय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार त्यांनी खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांना रामपूर येथे पाठविले. डॉ. परदेशी यांच्यासमोरही घोगरे यांचा गोंधळ सुरूच होता. कारवाईची मागणीवैद्यकीय अधिकारी शिवराज घोगरे यांच्या व्यसनामुळे डॉ. परदेशी यांना खरवते येथील ओपीडी सोडून रामपूर येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी जावे लागले. येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने अनेक वैद्यकीय अधिकारी मनमानी करीत आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम यांनी केली आहे.